VIDEO : तू चाय बेच, देश मत बेच -छगन भुजबळ

VIDEO : तू चाय बेच, देश मत बेच -छगन भुजबळ

ठाण्यातील परिवर्तन रॅलीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 12 जानेवारी : 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वया एवढे पेट्रोलचे भाव झाले आहेत. आता एमडीएचच्या मसालेवाले काकांच्या वया एवढे हे भाव वाढवण्याचे प्रयत्न भाजपाचे सुरू असून या निमित्ताने चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये', अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज ठाण्यात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असताना भुजबळांनी एकेरी उल्लेख केला.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने गडकरी रंगायतन समोरील चैाकात आयोजित सभेत ते बोलत होते.'भाजप सरकारने केवळ फोडा आणि राज्य करा अशी भूमिका घेतली आहे. ओबेसीच्या विरोधात पाच पिटीशन कोर्टात आले आहेत. पण या विषयावर सरकारी वकील काहीच बोलत नाही. भाजप सरकार मराठा विरोधात ओबीसी अशी भांडणे लावण्याची कामे करीत', असल्याची टीका त्यांनी केली. 'या सरकारमधील लोकांनी देवतांच्या जाती काढण्याचे उद्योग सुरू केले आहेत. यांच्या कारभारामूळे भविष्यात देवतांन आरक्षणासाठी भांडण्याची वेळ येईल' असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना-भाजप एकाच नाण्याच्या बाजू -अजित पवार

अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेच्या राज्यात सर्वसामान्य नागरिकाना न्याय मिळणे बंद झाल्याची टीका केली. 'तेवीस वर्षी बेस्टचा कारभार शिवसेनेकडे आहे. पण, त्यांना तेथील कामगारांना न्याय देता आला नही. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना जे समाधानी करू शकत नाहीत. ते राज्यातील लोकांना काय समाधान देणार', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'शहरी भागात सातत्यानं लोकं शिवसेना निवडून देतात. एकदा आम्हाला निवडून द्या मग बघा आम्ही काय करतो. यांच्या सारखं खोटं बोलायचं आम्हाला जमत, नसल्याची टीका त्यांनी केली.

'शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लोकांना झुलवत ठेवायचं आणि काहीच करायचं नाही अशी त्यांनी कारभाराची पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे जाऊन किती वर्ष झाले, पण बाळासाहेबांचं स्मारक कधी करणार याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. पण, निवडणुका आल्या की यांना श्री राम प्रभू आठवतात, अशी टीका पवारांनी शिवसेनेवर केली.

'शिवसेना पापाची भागीदार' -जयंत पाटील

भाजप सरकारच्या कारभारात शिवेसेना पापाची भागीदार आहे. शिवसेनेचा दुटप्पीपणा सर्वांनी समजून घेतली पाहिजे. नाणारला सेनेने बाहेर विरोध केला आणि सभागृहात मात्र मुख्यमंत्र्यांनी इशारा करतात एकनाथ शिंदेंसह सर्वच मंत्री आमदार सेनेचे आपल्या खुर्चीवर बसल्याचं पाहावयास मिळाले. आज जुनी शिवसेना राहिलेली नाही, सत्तेसाठी लाचार होणारी शिवसेना गुळाच्या ढेपेसारखी भाजपाला चिकटून बसली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

====================

First published: January 12, 2019, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading