VIDEO : पक्ष कोणता ते बघू नका, चांगल्या माणसाचा प्रचार करा -पंकजा मुंडे

VIDEO : पक्ष कोणता ते बघू नका, चांगल्या माणसाचा प्रचार करा -पंकजा मुंडे

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता राजकीय दृष्ट्या पंकजा मुंडे यांचं हे विधान वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे

  • Share this:

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 07 जानेवारी : 'पक्ष कोणता ते बघू नका, माणूस बघा, पक्षाचा प्रचार करा असं मी म्हणत नाही, चांगल्या माणसाचा प्रचार करा' असं वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन आणि महिला बचत गटाचा संयुक्त मेळावा लातुरात घेण्यात आला. यावेळी राज्यातल्या अनेक जिल्ह्यातले ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सकाळपासूनच लातुरात हजेरी लावली होती वीस हजारांपेक्षाही जास्त संख्या असलेल्या या सभेत पंकजा मुंडे यांनी, "पक्ष पाहू नका माणूस बघा आणि चांगल्या माणसाचाच प्रचार करा", असं विधान करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे.

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता राजकीय दृष्ट्या पंकजा मुंडे यांचं हे विधान वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

'ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा देत पीएफ आणि ग्रॅज्युइटीचा निर्णय घेणार, असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. याशिवाय, "मी राजकारणात आले ते फक्त विधात्यासोबत भांडण आहे म्हणून, गरिबांचा नेता तुम्ही म्हणतात. त्यामुळं त्या विधात्यासोबत माझं भांडण होतं. ज्या दिवशी मुंडे साहेबांना मी अग्नी दिला त्याच दिवशी  मी शपथ घेतली की, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार नाही", असं म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देखील त्यांनी यावेळी दिला.

=====================

First published: January 7, 2019, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading