मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विजांसह पाऊस असेल तर काय काळजी घ्याल? दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक

विजांसह पाऊस असेल तर काय काळजी घ्याल? दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक

एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो.

एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो.

एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 सप्टेंबर : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव उत्साहात झाला नाही. मात्र, या वर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यात गणेशोत्सव पार पडला. आज लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यातच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसालाही सुरुवात आहे. जळगाव जिल्ह्यात तर सकाळी दोन बापलेकांचा वीज पडून मृत्यू झाल्याचीही दुर्दैवी घटना घडली. वीज पडणे ही नैसर्गिक घटना आहे. मात्र, तिचे तीव्र पडसाद मानवाला भोगावे लागतात. तर मग वीजेपासून बचावासाठी नेमके काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या, या सविस्तर अहवालातून.

वीजेच्या घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असतात. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य पशु आणि वित्तहानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे.

जर वीज पडली तर - 

तुमच्या आसपास अथवा कोणा व्यक्तीवर वीज पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्ती वर प्राथमिक उपचार करतांना या गोष्टींचा विचार करा.

श्वासोच्छवास - जर थांबला असेल, तर त्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक श्वासोच्छवास सुरू होण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके- थांबले असल्यास सीपीआर (CPR) चा उपयोग करावा.

नाडीचा ठोका - चालू असेल आणि श्वासोच्छवास चालू असेल, तर इतर काही जखमा अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा हयाबाबत नोंद करा. दृष्टी ठीक आहे नाव ऐकू येत आहे ना व इतर हालचाली याची नोंद घ्या.

विजांचा पाऊस होताना हे करू नये - 

विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की - हेअर ड्रायर, विद्युत टूथ ब्रश किंवा विद्युत रेझर, जर विज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

वादळात टेलिफोनचा वापर टाळा.विज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते. बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा. जर वीज ह्या तारांवर किंवा मनोऱ्यावर कोसळली, तर प्रवाह सुरक्षितपणे या तारातून जमिनीत या अशीच त्यांची रचना असते.

विजांचा पाऊस सुरू असताना हे करा -

तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरीत आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे विजेला स्वतः कडे आकर्षित करतात.

तुम्हाला आसरा मिळाला नाही. तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर यांचा जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा.

लक्षात ठेवा. विजेचा प्रकाश आणि आवाज यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याचा तीनने भागाकार केला असता ज्या ठिकाणी कोसळली तिथेपर्यंतचे अंतर किलोमोटरमध्ये अंदाजे कळू शकते.

जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचेनळ असलेल्या जागा आणि टेलीफोन, पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोटया नावेतून पाण्यातून जात असाल तर काठावर बाहेर या.

हेही वाचा - आकाशातून मृत्यू कोसळला! जळगावात बापलेकाचा हृदयद्रावक शेवट

जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्या वर विज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

First published:

Tags: Maharashtra News, Rain, Rain fall