मला फाशी नको, जन्मठेप द्या ; कोपर्डी प्रकरणातील दोषीची गयावया

मला फाशी नको, जन्मठेप द्या ; कोपर्डी प्रकरणातील दोषीची गयावया

एवढंच नाहीतर त्याने आपण 'निर्भया'ला मारलं नाही असा दावाही केला.

  • Share this:

21 नोव्हेंबर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणीतील दोषींच्या शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. आरोपी जितेंद्र शिंदेनं आपल्याला फाशीऐवजी जन्मठेप द्यावी अशी मागणी केलीये.

या प्रकरणातील दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी कोर्टात मागणी केली. या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने फाशी ऐवजी जन्मठेप किंवा कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलीय. एवढंच नाहीतर त्याने आपण 'निर्भया'ला मारलं नाही असा दावाही केला. तर दुसरीकडे  या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केलाय.

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उद्या आपली बाजू मांडतील. निकम यांनी या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

 कोपर्डी प्रकरणी युक्तिवाद

 दोषी नंबर एक - जितेंद्र शिंदे

- जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण

- मी तिला मारलं नाही, शिंदेचा कोर्टात दावा

- फाशीऐवजी जन्मठेप किंवा त्याहून कमी शिक्षेचा विचार करा - शिंदे

दोषी नंबर तीन - नितीन भैलुमे

- दोषी नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण

- मी निर्दोष आहे - नितीन भैलुमे

- दोषीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

- तो 26 वर्षांचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य

- त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून

- त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता

कोणते गुन्हे कोर्टात सिद्ध झाले

- कलम 302 - खून

- कलम 376 - बलात्कार

- कलम 120 (ब) - गुन्हेगारी कट रचणे

- कलम 109 - गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे

- कलम 354 - छेडछाड

- पॉस्को कायद्याअंतर्गत 3 कलमं

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 05:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading