• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, जबरदस्ती केली तर रूळ उखडतील -राज ठाकरे

बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, जबरदस्ती केली तर रूळ उखडतील -राज ठाकरे

देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहे. ते कुठलाही निर्यय घेऊ शकत नाही. जेव्हा यांना काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहांना विचारावं लागलंय.

  • Share this:
वसई, 30 एप्रिल : बुलेट ट्रेनसाठी वसई आणि पालघरच्या जनतेनं जमीन देऊ नये, जर बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडले जातील असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.: बुलेट ट्रेनसाठी वसई आणि पालघरच्या जनतेनं जमीन देऊ नये, जर बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडले जातील असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला वसई इथून सुरुवात केली. वसई इथं झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. 'माणूसघाणा पंतप्रधान पाहिला नाही' नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे सगळ्याच आधी जाहीरपणे सांगणारा नेता मीच होतो. पण मला तेव्हा वाटलं म्हणून म्हटलं पण आज पाहिलेले  मोदी हे ते नाहीच. एवढा माणूसघाणा पंतप्रधान मी पाहिला नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसंच नरेंद्र मोदीं हे गुजरातचे पंतप्रधान आहे. भारताचे नाहीत. त्यांना पहिले गुजरातचा विचार येतो तर मग राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा विचार केला तर संकुचित का ठरवलं जातं? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.  पंतप्रधान आणि मुख्यमंत्री थापडे आहे. यांची भाषणं म्हणजे फक्त थापा आहे. नरेंद्र मोदी हे लंडनमध्ये जावून भारतीय डॉक्टरांचा अपमान केला असा आरोपही राज ठाकरेंनी केला. 'देवेंद्र फडणवीस बसवलेले मुख्यमंत्री' देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहे. ते कुठलाही निर्यय घेऊ शकत नाही. जेव्हा यांना काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहांना विचारावं लागलंय. मुळात फडणवीस हे दिल्लीच्या चालीवर नाचतात, त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हागणदरी मुक्त झाली अशी घोषणा केली. पण मला सांगा संडासमध्ये सर्वात गरजेचं असतं ते पाणी, राज्यात पाणी आहे का ? तर नाही. मग पाणीच नाही तर संडास बांधून फायदा काय अशी खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली. राज्यात कोणताही प्रकल्प आला तर आपल्याकडच्या राजकर्त्यांना गुजराती प्रेम उफाळून येतं. नाणार प्रकल्पासाठी कित्येक जमिनी ह्या गुजराती लोकांनी घेतल्या आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी भरसभेत गुजराती लोकांची यादी वाचून दाखवली. मग नाणारमधल्या जमिनी या गुजराती लोकांनी का घेतल्या? असा सवालही राज ठाकरेंन उपस्थितीत केला. 'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका' बुलेट ट्रेनच्या मार्गावरच्या जमीनीही हेच लोक घेताहेत. कित्येक जमिनी गुजराती लोकांच्या घश्यात सरकार घालत आहे. बुलेट ट्रेनसाठी एक इंच जमिनीही तुम्ही देऊ नका, उद्या जर सरकारने जबरदस्ती केली आणि जमिनी बळकावल्या तर बुलेट ट्रेनचे रूळ उखडले जातील असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. 'भाजपकडे निवडणूक लढायला पैसे कुठून आले' एटीएममध्ये गेलो तर नोटा नाही असं सांगितलं. जातं याबद्दल सरकारला विचारला तर सरकार म्हणतंय नोटा  छापण्यासाठी शाई संपली आहे. अरे शाई संपायला हे काय वाण्याचं दुकान आहे का ?, डिजीटल, कॅशलेस सांगणाऱ्या भाजपकडे नोटाटंचाईत निवडणूक लढायला पैसे कुठून आले ? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. 'आरक्षणासाठी आपणच भांडतो' आरक्षण मुळात लागतं कशाला? फक्त शिक्षणात आणि सरकारी नोकरीत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के आहे. या पाच टक्क्यांसाठी आपण भांडतोय असंही राज ठाकरे म्हणाले.
First published: