येस बँकेत पैसे ठेवू नका, तरीही नाशिक पालिकेनं जमा केले 324 कोटी!

येस बँकेत पैसे ठेवू नका, तरीही नाशिक पालिकेनं जमा केले 324 कोटी!

या ऑडिट रिपोर्टद्वारे मनपाला वेळीच जागे करण्याचा प्रयत्न केला म्हणून या ऑडिटर फर्मकडून त्वरीत कामही काढून घेण्यात आलं होतं.

  • Share this:

नाशिक, 07 मार्च :  रिझर्व्ह बँकेने नुकतेच आर्थिक निर्बंध ज्या बँकेवर जाहीर केले त्या येस बँकेमध्ये नाशिक महानगर पालिकेचे 324 कोटी रुपये अडकले असल्याची बाबसमोर आली आहे. या बँकेत पैसे ठेवू नका, असा ऑडिट रिपोर्ट असतांनाही पालिकेनं हे पैसे बँकेत ठेवले होते.

21 सप्टेंबर 2018 रोजी 'साबद्रा अँड साबद्रा' या ऑडिट फर्मने येस बँकेत पैसे ठेवू नका, असा स्पष्ट इशारा ऑडिट रिपोर्टद्वारे स्मार्ट सिटी डायरेक्टर बोर्डासमोर सादर केला होता. हा रिपोर्ट सादर केल्यानंतरही  घरपट्टी आणि पाणीपट्टीचे 136 कोटी रुपयांसह शासनाकडून आलेल्या अनुदानाचे 173 कोटी रुपये आणि स्मार्ट सिटीचे 15 कोटी रुपये असे एकूण 324 कोटी रुपये हे येस बँकेत ठेवण्यात आले होते. आता रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातल्यामुळे हे बुडाल्यात जमा आहेत. त्यामुळे शहरातील विविध विकासाची कामे, कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात आलेले आहेत.

धक्कादायक म्हणजे, या ऑडिट रिपोर्टद्वारे मनपाला वेळीच जागे करण्याचा प्रयत्न केला म्हणून साबद्रा अँड साबद्रा या ऑडिटर फर्मकडून त्वरीत कामही काढून घेण्यात आलं होतं. याआधीही सहकारी बँकांमध्ये नाशिक महापालिकेच्या ठेवी बुडाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं असताना आणि सहकारी आणि खाजगी बँकांमध्ये पैसे न ठेवता सरकारी बँकांमध्ये ते ठेवण्यात यावेत असा स्पष्ट आदेश होता.

परंतु, असं असतानाही हे पैसे कुणाच्या सांगण्यावरून येस बँकेत ठेवले गेले? कोणाचे हात ओले झाले? असा आरोप नगरसेवक शाहू खैरे यांनी केला आहे.

राणा कपूर यांच्या घरावर छापे

दरम्यान,  येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर शुक्रवारी संध्याकाळी छापे मारण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले आहे. अजूनही त्यांची चौकशी सुरू आहे

राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले आहे. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.  राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन  हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. त्यातून राणा कपूर यांचे नाव समोर आलंय. राणा कपूर यांच्या घरातील एका व्यक्तीच्या खात्यात वेळो वेळी मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती देखील ईडीला सूत्रांनी दिली. फक्त राणा कपूरच नाही तर यस बँकेचे आणखी ३ अधिकारी ईडीच्या रडारवर असून लवकर त्यांच्यावर देखील ईडीची गाज पडेल, असं बोललं जातंय.

 

YES बँकेवर निर्बंध येण्याआधी 24 तासांत गुजरातच्या कंपनीनं काढले 265 कोटी

आरबीआयने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध घातले आहेत. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 50 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे. रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लादण्याआधी गुजरातच्या वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं तब्बल 265 कोटींची रक्कम काढून घेतल्याची बाब समोर आली आहे. या कंपनीने आपली सर्व रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून हे निर्बंध लावल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून मिळालेली रक्क येस बँकेत जमा करण्यात आली होती. मात्र आरबीआयने निर्बंध लावण्याआधीच या बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत वळवण्यात आले आहेत. इतकच नाही तर सरकारी योजनेतू येणारा पैसा आणि बँकेतील ठेवी ग्राहकांना कसे देणार हा प्रश्न बँकेसमोर असल्यानं बँक अडचणीत सापडली आहे.

मार्च 2019 मध्ये येस बँकेवर RBIनं एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सप्टेंबर 2019 पासून सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)या प्रकरणी चौकशी करत आहे. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यातही येस बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये येस बँकेचे माजी प्रवर्तकांची संपूर्ण भागिदारी विकली होती.तसंच सन 2014 च्या आधीपासूनच येस बँकेचा कारभार दबावाखाली होता. यामध्ये एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, आयएलअँण्डएफएस आणि व्होडाफोन सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे.

First published: March 7, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading