राज्यभर दिवाळी पाडव्याचा उत्साह; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी

राज्यभर दिवाळी पाडव्याचा उत्साह; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत गर्दी उसळते आहे.

  • Share this:

20 ऑक्टोबर: आज दिवाळी पाडवा! कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत गर्दी उसळते आहे.

आजच्या दिवशी बलिपूजनला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रमसंवत्सराला प्रारंभ होतो. व्यापाऱ्यांच्या नव्या वर्षालाही याच दिवशी सुरुवात होते. अभ्यंगस्नानानंतर या दिवशी बायको पतीला औक्षण करण्याचेही महत्त्व आहे.

आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकर तरूणाई सारसबागेच्या तळ्यातल्या गणपतीला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदाही अशाच प्रकारे हजारोंच्या संख्येने तरूण तरूणी भल्या पहाटे दिपोत्सवासाठी सारसबागेत हजर झाली होती. यंदा मात्र दीपोत्सवासाठी आकाशदिवे उडवण्यावर पोलिसांनी बंदी घातली होती. त्यामुळे हे आकाशदिवे जप्त करून मगच पोलीस सगळ्यांना आत सोडत होते. दीपोत्सव आणि तरूणाईचा उत्साह पहाटे सारसबागेत पहायला मिळाला.

तसंच उर्वरित राज्यातही पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 01:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading