ST च्या 1 लाख कर्मचाऱ्यांना मिळाली दिवाळीची ही खास भेट

ST च्या 1 लाख कर्मचाऱ्यांना मिळाली दिवाळीची ही खास भेट

या हंगामातही ST ची 10 टक्के भाडेवाढ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

  • Share this:

मुंबई 23 ऑक्टोंबर : दिवाळी आली की कर्मचाऱ्यांना वेध  लागतात ते दिवाळी बोनसचे. ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 4 वर्षाप्रमाणेच याही वर्षी सरकारनं महामंडळाच्या 1 लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केलीय. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. गेली 4 वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10 हजार बोनस देण्यात आला आहे. एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त 2,500 व 5,000 इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही सुरू असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय.

BCCI अध्यक्ष होताच धोनीच्या निवृत्तीबद्दल काय म्हणाला गांगुली?

निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा दिवाकर रावते यांनी केलीय. केंद्र व राज्यशासनाप्रमाणे 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये  3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीही एस.टी कर्मचाऱ्यांना आनंदाची होणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातर्फे 24 ऑक्टोंबर ते 05 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3,500 बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याच्या धोरणानुसार या हंगामातही 10 टक्के भाडेवाढ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ 05 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील. ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) या बसेसला लागू राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या