भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली सोन्यासारखी झेंडूची फुलं

भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली सोन्यासारखी झेंडूची फुलं

ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलांना दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल

  • Share this:

कल्याण, 26 ऑक्टोबर: ऐन दिवाळीत फुलांना दर मिळत नसल्यानं कल्याणमध्ये शेतकऱ्यांनी शेकडो किलो फुलं रस्त्यावर फेकून दिली. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये सोन्यासारख्या फुलांचा खच पडल्याचं पाहायवला मिळालं. धक्कादायक म्हणजेच कचऱ्यातली ही फुलं वेचून छोटे व्यापारी मात्र स्वत:चं उखळ पांढरं करताना दिसत आहेत. कल्याण परिसरातले अनेक शेतकरी चांगला दर मिळेल या आशेनं झेंडू आणि इतर फुलं विकायला एपीएमसी मार्केटमध्ये आले होते. मात्र किलोमागे 12 ते 15 रुपये एकूण खर्च असताना त्यांना मार्केटमध्ये 2 ते 5 रुपये दर मिळाला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं या शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवत ही फुलं रस्त्यावर फेकू दिली आणि घरचा रस्ता धरला. मात्र आता मुलाबाळांसह दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

तिकडे मनमाडमध्येही बाजार समितीत झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. झेंडूच्या फुलांना किलोमागे 5 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. कष्टाने पिकविलेल्या फुलांना मातीमोल दर मिळत असल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात फुलं फेकून दिली आहेत. सण-उत्सवाच्या काळात विशेषता  दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे सणासुदीच्या काळात दोन पैसे हातात पडतील या आशेवर मनमाड,मालेगाव,येवला,चांदवड,नांदगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती.मनमाड बाजार समितीत नाशिक,मुंबई यासह इतर शहरातील व्यापारी झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी येतात दरवर्षी प्रमाणे यंदा ही व्यापारी आले मात्र  मात्र  गेल्या काही दिवसा पासून सलग होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका फुलांच्या शेतीला बसला.

राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळं फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. झाडांवरच ओली झालेली फुलं बाजारात येईपर्यंत खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळं या फुलांना 5 रुपये किलोच्यावर दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेत. ही फुलं नाशिकहून कल्याणला आणण्यासाठीच एका किलोमागे ७ रुपयांचा खर्च असून त्याच्यावर आम्हाला दोन ते तीन रुपयेही मिळणार नसतील, तर आमच्या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार? असा उद्विग्न सवाल हे शेतकरी विचारत आहेत. यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी आपली फुलं रस्त्यावर टाकून देत परतीची वाट धरलीये. तर अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दरानं फुलांची विक्री करत आहेत. मात्र या सगळ्यातही अनेक जण ही फेकून दिलेली फुलंही जमा करून विकण्यासाठी नेताना पाहायला मिळतायत. सरकारने आम्हाला अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

Published by: Kranti Kanetkar
First published: October 26, 2019, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading