परभणी, 1 डिसेंबर : परभणी (Parbhani) शहरात प्रशासनाकडून दोन पेट्रोलपंप सील (Petrol pumps sealed) करण्यात आले आहेत. कोरोना नियमांचे (Corona Rules) उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपांवर आता कारवाई केली जात आहे. परभणीतही संबंधित पेट्रोल पंपावर कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य आणि देशावर कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडक नियमावली करण्यात आली आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आलीय.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रन या नव्या विषाणूने धुमाकूळ घातल्याने राज्यातही धाकधूक वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परभणीत जिल्ह्यात देखील तशाच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोल पंपांसाठी काही नियम लागू केले आहेत. पण त्या नियमांचे शहरातील दोन पेट्रोल पंपांवर उल्लंघन केलं जात असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यामुळे प्रशासनाने दोन्ही पेट्रोल पंप सील केले आहेत. संबंधित कारवाई ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
हेही वाचा : "मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही" : सचिन वाझेचा अजब दावा
परभणीत पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी लस घेतली आहे का? याची शहानिशा करुनच पेट्रोल विक्रीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मास्कर न घालणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल न देण्याचे आदेश आहेत. यासोबतच पेट्रोल पंपांवर सूचना फलक लावण्याची सूचना देण्यात आली होती. पण संबंधित पेट्रोल पंपांवर या तीनही नियमांचं उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड भरण्यातही असमर्थता दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली.
हेही वाचा : किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता जालन्यातलाच राष्ट्रवादीचा मोठा नेता?
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अशीच कारवाई केली होती. सुनील चव्हाण एक सामान्य व्यक्ती म्हणून पेट्रोल पंपावर दाखल झाले होते. ते तिथे जवळपास दहा ते पंधरा मिनिटे थांबले. तिथे थांबल्यावर संबंधित पेट्रोल पंपावर कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी पेट्रोल पंप सील केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.