मुंबई, 22 मे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (shiv sena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंडाळीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान सरकार अस्थिर असल्याचे थेट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत सूचक ट्वीट (Sanjay Raut Tweet) केल्याने राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. महाविकास आघाडी (mahavikas aghadi) बरखास्त होण्याची शक्यता त्यांनी थेट ट्वीटच्या (twitter) माध्यमातून व्यक्त केली.
दरम्यान संजय राऊत यांच्या ट्विटमुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. राऊत सरकारमध्ये आहेत त्यांनी असे ट्वीट करणे योग्य नाही कॅबीनेटची मिटींग होण्यापूर्वी कसे काय तुम्ही निर्णय घेता असाही सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी केला. याचबरोबर याबाबत उद्धव ठाकरेंना ही माहिती देणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा : BREAKING : उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता
काय म्हणाले आहेत संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आता बरखास्तीकडे चालली आहे, असं सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकाराचा संसार अखेरीस अडीच वर्षात आटोपला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता खाली टेकले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : BREAKING : उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले, दिले थेट आव्हान
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, NCP, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)