देवणी, 07 जुलै: लातूर (Latur) जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी गावच्या शिवारात 21 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली होती. मृताची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण 21 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं (murder mystery raveled after 21 days) आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक (2 Arrest) केली आहे. हत्येचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बालाजी बनसोडे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील बिहारीपूर येथील रहिवासी आहे. 16 जूनच्या रात्री देवणी तालुक्यातील वलांडी याठिकाणी बनसोडे यांची दोघांनी दगडानं ठेचून हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी बनसोडे यांच्याजवळील सर्व कागदपत्रे, ओळखपत्र, मोबाईल फोन घेऊन पळ काढला. आरोपींनी मृत बनसोडे चालवत असलेलं पिकअप घेऊन घटनास्थळावरून पळून गेले.
हेही वाचा-गोव्याला फिरायला गेलेल्या तरुणासोबत घडलं विपरीत; 3दिवसांनी समुद्रात आढळला मृतदेह
सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या पाच दिवसांनी बालाजी बनसोडे यांचा मृतदेह देवणी तालुक्यातील वलांडी शिवारात स्थानिक नागरिकांना दिसला आणि हत्येचं प्रकरण उघडकीस आलं. पण मयत व्यक्तीची ओळख पटेल असा कोणताही पुरावा नव्हता. यानंतर पोलिसांनी तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा-बायकोला सासरी न पाठवल्यानं जीवघेणी शिक्षा; सासूच्या डोक्यात दगडी जातं घातलं अन्.
नेमकं काय घटलं त्या रात्री?
हत्येच्या दिवशी 16 जून रोजी हेळंब येथील रहिवासी असणारे आरोपी विकास रघुनाथ सूर्यवंशी आणि ज्ञानेश्वर भारत बोरसुळे यांना उदगीरला जायचं होतं. त्यांनी अनेक वाहनांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वाहनं थांबली नाहीत. दरम्यान मृत बालाजी बनसोडे हे महिंद्रा पिकअप घेऊन त्याच रस्त्यानं प्रवास करत होते. दरम्यान आरोपी विकास रघुनाथ सूर्यवंशी आणि ज्ञानेश्वर भारत बोरसुळे यांनी मृत बनसोडे यांच्या वाहनाच्या आडवं येत वाहन थांबवलं. यामुळे चालक बनसोडे आणि दोन आरोपींमध्ये बाचाबाची झाली. यातूनच आरोपींनी बनसोडे यांची दगडानं ठेचून हत्या केली आणि मृताचा पिकअप घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Latur, Murder Mystery