Home /News /maharashtra /

बीडमध्ये शेती करण्यावरून वाद, गावगुंडांचा दलित कुटुंबावर लाठ्या काठ्याने हल्ला

बीडमध्ये शेती करण्यावरून वाद, गावगुंडांचा दलित कुटुंबावर लाठ्या काठ्याने हल्ला

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गावतील टोळक्याने पाठलाग करून लहान मुलं आणि महिलांवर दगडफेक करून हाकलून लावले आहे.

बीड, 11 डिसेंबर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्या जिल्ह्यातच दलित समाजातील (attack on dalit family) कुटुंबावर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पिक घेतल्याच्या कारणावरून गावातील लोकांनी कुटुंबाला लाठ्या-काठ्या आणि दगडाने मारहाण केली. माजलगाव तालुक्यातील हिवरागावात ही धक्कादायक घटना घडली आहे. हिवरागावात राहणाऱ्या एका नवबौद्ध समाजातील कुटुंबावर गावातील गावगुंडांनी भीषण हल्ला केल्याची संतापजनक घटना आज दुपारी घटली. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत नवे नियम, सरकारने जारी केली सूचना गोदावरी नदीच्या काठच्या शेतात पीक घेतल्यामुळे नवबौद्ध समाजाच्या नागरिकांना गावातील गावगुंडांनी अमानुष मारहाण केली. लाठ्या काठ्या आणि कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत 6 जण जखमी झाले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गावतील टोळक्याने पाठलाग करून नवबौद्ध समाजातील लहान मुलं आणि महिलांवर दगडफेक करून हाकलून लावले आहे. या व्हिडीओमध्ये महिलांचा रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येत आहे. कोल्हापूरकरांनी आणखी एका वीर सुपुत्राला गमावले,ड्युटीवर जवानाने सोडले प्राण या मारहाणीत 6 जण जखमी झाले आहे. जखमींना माजलगाव इथं शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी दोन्ही गटातील जमावांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, बीड

पुढील बातम्या