Home /News /maharashtra /

डीजेच्या तालावर केलेला धांगडधिंगा जीवावर बेतला, रंगपंचमीच्या दिवशीच तरुणाची निर्घृण हत्या

डीजेच्या तालावर केलेला धांगडधिंगा जीवावर बेतला, रंगपंचमीच्या दिवशीच तरुणाची निर्घृण हत्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Murder in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी याठिकाणी डीजेच्या गाण्यावर डान्स (Dance on DJ) करताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे.

    आर्णी, 20 मार्च: भारतीय संस्कृतीत धुलिवंदन किंवा रंगपंचमी हा सण ऐक्याचा सण मानला जातो. आपसातील मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. पण या सणाला गालबोट लावणाऱ्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या आर्णी (Arni) याठिकाणी देखील अशीच एक घटना समोर आली आहे. डीजेच्या गाण्यावर डान्स (Dance on DJ) करताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला (Attack with sharp weapon) करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी एका अनोळखी तरुणासह चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चंदन सोयाम (24), संदीप पेंदोर (वय-20) आणि रोहन सोयाम  (वय- 21) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. अन्य एका आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. संबंधित सर्व युवक आर्णी शहरातील महाकाली चौकातील रहिवासी आहेत. तर आतिष महादेव ढोले असं हत्या झालेल्या 34 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो आर्णी शहरातील गणपती चौक परिसरातील रहिवासी होता. हेही वाचा-रंग टाकण्यास रोखलं तर सुऱ्याने पोटातील आतडेच काढले बाहेर; 2 तरुणांची हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आतिष याचं आर्णी शहरातील गणपती मंदिर चौक परिसरात पान शॉप आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी रंगपंचमी निमित्त तो चौकात डीजे लावून परिसरातील काही तरुणांसोबत डान्स करत होता. यावेळी संबंधित आरोपींनी 'तुम्ही आमच्यात डान्स करू नका' असं म्हटलं. यातून आरोपी चंदन सोयाम आणि आतिष यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपी चंदनने धारदार शस्त्राने आतिषच्या पोटात वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. हेही वाचा-धुलिवंदनाला गालबोट, DJ वर नाचता नाचता तरुणानं स्वतःच्याच छातीत खुपसला चाकू या हल्ल्यात जखमी झालेल्या आतिषला आसपासच्या लोकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चंदन सोयाम याच्यासह संदीप पेंदोर, रोहन सोयाम आणि अन्य एका अनोळखी तरुणाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आर्णी शहर पोलीस करत आहेत. डीजेच्या गाण्यावर नाचवण्यावरून झालेल्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Yavatmal

    पुढील बातम्या