मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भंडाऱ्यात भाजपमध्ये राडा, पक्ष 'हा' लिमिडेट लोकांचा पक्ष, माजी आमदाराचं टीकास्त्र

भंडाऱ्यात भाजपमध्ये राडा, पक्ष 'हा' लिमिडेट लोकांचा पक्ष, माजी आमदाराचं टीकास्त्र

'आमदार फुके यांना भंडारा- गोंदियात अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळे यांनी मला निष्काषित करण्याचा हा डाव खेळला'

'आमदार फुके यांना भंडारा- गोंदियात अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळे यांनी मला निष्काषित करण्याचा हा डाव खेळला'

'आमदार फुके यांना भंडारा- गोंदियात अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळे यांनी मला निष्काषित करण्याचा हा डाव खेळला'

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 11 मे  : भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपने चरण वाघमारे यांना निष्काषित केले आहे. पण,  आपली जागा वाचविन्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी मला निष्काषित केले असून भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष असल्याची टीका  चरण वाघमारे (charan waghmare) यांनी केली आहे. चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. 'विधानपरिषद आमदार डॉ परिणय फुके यांच्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण खराब झाले होते, भाजप पक्षश्रेष्ठीने वातावरण निवळण्यासाठी फुकें यांना नागपुरला परत बोलवण्याचे ठरविले होते, मात्र फुके नागपुरला परत आल्यास आपले पद-आपली जागा धोक्यात येईल. हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओळखले होते. त्यामुळेच आमदार फुके यांना भंडारा- गोंदियात अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळे यांनी मला निष्काषित करण्याचा हा डाव खेळल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. (अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदा बोलली तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर, म्हणाली....) 'राष्ट्रवादीला विरोध असणे हे मला निलंबित करण्याचा हा केवळ बहाना आहे. चद्रकांतदादा पाटील यांना फुस लावून माझे निष्काषित करण्यात आले आहे, अशी टीकाही वाघमारे यांनी बावनकुळे यांच्यावर केली. (महापालिका निवडणुका तात्काळ लागल्यास अडचणींचा डोंगर, मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं) तसंच, 'भाजप किती ही ओरड करत असला की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे सर्वे खोटे असून भाजप हा लिमिडेट लोकांचा पक्ष आहे', अशी टीकाही वाघमारे यांनी केली.  नाना पटोलेंनी दिली चरण वाघमारे यांना ऑफर दरम्यान, भंडारा जिल्हा परिषदेत  काँग्रेसला जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन करण्यास मदत करणारे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नांना पटोले यांनी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. आम्हाला चरण वाघमारे सारखा विकास पुरुष मिळेल असेही नाना पटोले यांनी चरण वाघमारे यांना उद्देशुन म्हटले आहे.  मात्र, आपण कार्यकर्त्यांसोबत विचारमंथन करून पुढील भूमिका ठरवू, असं चरण वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या