मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : सिंधुदुर्गात भाजप, शिवसेनेत तुफान हाणामारी, वैभव नाईकांनी हातात दांडा घेतला अन्..

Video : सिंधुदुर्गात भाजप, शिवसेनेत तुफान हाणामारी, वैभव नाईकांनी हातात दांडा घेतला अन्..

कणकवली तालुक्यातील कनेडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचदरम्यान वैभव नाईक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

सिंधुदुर्ग, 25 जानेवारी :  मंगळवारी कणकवली तालुक्यातील कनेडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर कनेडीमध्ये तणावपूर्ण वातावरण पहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना वेळीच रोखलं, अन्यथा हा वाद आणखी चिघळला असात. या व्हिडीओची मात्र आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल कणकवली तालुक्यातील कनेडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना व नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली. यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर भाजपचे शेकडो कार्यकर्ते कनेडीमध्ये जमले होते, तेवढ्याच संख्येनं शिवसेनेचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर गोंधळ घातला. तसेच एका रिक्षाला लक्ष्य करण्याचा देखील प्रयत्न केला.

नाईक यांचा व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभाव नाईक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते हातात एक लाकडी दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. त्यांना पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला अन्यथा राडा अधिक चिघळण्याची शक्यता होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

First published:

Tags: BJP, Shiv sena