Home /News /maharashtra /

खारेगाव उड्डाणपुलाचा श्रेयवाद 'बाप-बेट्या'पर्यंत, जितेंद्र आव्हाड-श्रीकांत शिंदे यांच्यात खतरनाक जुंपली

खारेगाव उड्डाणपुलाचा श्रेयवाद 'बाप-बेट्या'पर्यंत, जितेंद्र आव्हाड-श्रीकांत शिंदे यांच्यात खतरनाक जुंपली

जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा "आम्ही बापाच्या भूमिकेत आहोत. तरुण सळसळतं रक्त आहे. परीपक्वता आली पाहिजे", असं श्रीकांत शिंदेंना उद्देशून म्हणाले. त्यांच्या या विधानाला श्रीकांत शिंदे यांनी देखील उत्तर दिलं.

पुढे वाचा ...
ठाणे, 15 जानेवारी : कळवा-खारेगाव उड्डाणपुलाच्या (Kharegaon flyover bridge) श्रेयवादावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) चांगलीच झुंपली आहे. खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमात भर मंचावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना टोला लगावला. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जितेंद्र आव्हाड यांची भाषणादरम्यान समजूत काढण्याता प्रयत्न केला. पण उड्डाणपुलाच्या श्रेयवादाचा हा वाद कार्यकर्त्यांपासून ते बॅनरपर्यंत बघायला मिळाला. हा वाद कार्यक्रम संपल्यानंतरही संपला नाही. कारण कार्यक्रम संपल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना परस्परांना चिमटे काढले. खासदार श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा "आम्ही बापाच्या भूमिकेत आहोत. तरुण सळसळतं रक्त आहे. परीपक्वता आली पाहिजे", असं श्रीकांत शिंदेंना उद्देशून म्हणाले. त्यांच्या या विधानाला श्रीकांत शिंदे यांनी देखील उत्तर दिलं. "परीपक्व असा कुठलाच माणूस नसतो. ते जर स्वतःला बापाच्या भूमिकेत समजतात तर मुलाच्या यशाने त्यांना त्रास का होतोय? मला परिपक्व व्हायचे नाही. कारण माणूस परिपक्व झाला की त्याची रिटायरमेंटची वेळ येते. मला जनतेत राहायचंय, काम करत राहायचंय", असा टोला श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना लगावला. तसेच "कळवा-खारेगाव उड्डाणपुलाला 2012 साली मंजुरी मिळाली होती तर मग 2012 ते 2017 या काळात काय काम झालं? मुळात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यात टाईमलाईन चुकली आहे. लँड अॅक्वीझिशनपूर्वी पूल कसा बांधला गेला? हे त्यांनी सांगितले", असं श्रीकांत शिंदे म्हणाले. (भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांकडून नाराजी व्यक्त, एकनाथ शिंदे म्हणतात...) जितेंद्र आव्हाड आणखी काय म्हणाले? "मी आमदार झालो तेव्हा; पुस्तक छापणार होतो त्यात मी सगळं लिहणार होता. असीम गुप्ता यांनी निधी दिला आणि भूमिपूजन झालं.रेल्वेची परवानगी लागणार होती. रेल्वेचे गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागतो. हायकोर्टात 2 वर्षे गेली. तिथे 39 कोटी भरले. नंतर ती जमीन घेतली. 2009 पासून लहान मुलाला देखील माहितीय की कालवा कसा होता? तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना माहीत आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. "एकनाथ शिंदे यांनी माझा निधी कधीही थांबवला नाही किंवा त्यात अडवणूक पण केली नाही. या पुलासाठी परवानगी आनंद परांजपे यांनी आणली. कोणतेही पुलाचे काम करायला वेळ हा लागतोच. कालव्यातील तिसरा पूल खाडीतून चाललाय. महापालिकेने घाई का केली? हे मला माहित नाही. कारण मला पत्रिका काल आली. कालव्यातील जनतेला माहित आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है", असंदेखील आव्हाड यावेळी म्हणाले. "महाविकास आघाडीत खडा कोण टाकतंय? हे मला माहित नाही. याबद्दल बोलायचं देखील नाही. एकनाथ शिंदे यांना मी मनापासून मानतो. आम्ही दोघेही परिपक्व आहोत. त्यामुळे अशा कोणामुळे आमच्या मैत्रीत काही फरक पडणार नाही", अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. (Video : लतिकाच्या सौंदर्याचा वजनदार मामला, अभिनेत्रीचा मनात भरणारा लुक) "महापौर नरेश मस्के यांना मी 15 वर्षे चाणक्य बोलतोय. त्यांनी आता नारदमुनी होऊ नये. कालव्यातील झोपड्या जात होत्या तेव्हा मी रेल्वे ट्रॅकवर होतो. एकनाथ शिंदे यांना मी सकाळी बोललो तुमच्या लोकांनी असं का केलं? एकत्र बॅनर लावले पाहिजे होते आणि ते लागत नसतील तर दुर्दैव आहे. पत्रिका वाटण हे महापालिकेची जबाबदारी आहे. महापालिकेकडून कॅबिनेट मंत्र्याला एक दिवस आधी संगीतले जाते. महापालिका याला जबाबदार आहे. माझ्या पक्षात माझ्या व्यतिरिक्त आघाडी संदर्भात कोणीही काही बोलत नाही", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. "मागे क्लस्टरच्या विषयात देखील एकत्र रस्त्यावर उतरलो होतो. नाते जपायला तेवढी परिपकव्ता असावी लागते. गरम रक्त आहे. त्यांना आपणच सांभाळले पाहिजे. आपण बापाच्या भूमिकेत आहोत. आधीच चर्चा झाली असती तर खूप चांगलं चित्र दिसलं असतं", असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. "या कार्यक्रमांनानंतर देखील कोणी बाईट दिला असेल तर नारदमुनीच्या भूमिकेत कोण हे लक्षात घ्यावं. मला 100 टक्के माहित आहे एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव मोडणार नाहीत. आणि मी देखील असा प्रस्ताव मोडणार नाही", अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या