अनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप

अनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप

'मतं मिळविण्यासाठी आम्ही गुंडांना प्रवेश देतो असं दानवे सांगतात. अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील यांचा भाजप आज राहिला नाही.'

  • Share this:

मुंबई, ता.13 नोव्हेंबर : आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारांना पत्र लिहून पक्षावर अनेक खळबळजनक आरोप केलेत. धुळ्यातल्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्याने संतापलेल्या गोटे यांनी आमदारकी आणि भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचा वादही झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांन पत्र लिहूनं अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. भाजपमध्ये छोटा राजन आणि दाऊदशी संबंधीत गुंडाना प्रवेश दिला जातो, विधानपरिषद निवडणुकीत विनोद तावडेंनी पैसे वाटले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार पाडण्याचा डाव फसला. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना किंमत नाही असे अनेक आरोप आपल्या सात पानी पत्रात केले आहेत. गोटेंच्या या लेटर बॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात खलबळ उडाली आहे.

काय आहेत गोटेंचे खळबळजनक आरोप?

दानवे देतात गुंडांना पक्षात प्रवेश

गेली 30 वर्ष राजकारणात मला विरोध करणाऱ्या, दाऊद, छोटा राजन यांच्या सारख्यांना माझी सुपारी देणाऱ्या गुंडांना रावसाहेब दानंवे हे भाजपमध्ये मुक्त प्रवेश देत आहेत. या लोकांवर हत्या, अपहरण, खून, दरोडे यासारखे गुन्हे आहेत. भाजपचं अध:पतन अस्वस्थ करणारं आहे. मतं मिळविण्यासाठी आम्ही गुंडांना प्रवेश देतो असं दानवे सांगतात. अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील यांचा भाजप आज राहिला नाही.

विनोद तावडेंनी वाटले पैसे

धनंजय मुंडेंची विधान परिषदेची निवडणुक असताना विनोद तावडे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. मी मतदान केल्यानंतर त्यांचा एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरून फोन आला. ते म्हणाले तुमचे पैसै कुठे पाठवू, तुम्ही भाजपच्या आमदारांन पैसे दिले का असं विचारून मी त्यांना गप्प केलं. कारण आयुष्यात मी कधीच कुणाचा एक रूपयाही घेतला नाही. गोपीनाथ मुंडेंना मी ही गोष्ट सांगितली होती.

विलासरावांचं सरकार खाली खेचण्याचा डाव

विलासराव देशमुख आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार खाली खेचण्याचा भाजपचा डाव होता. राष्ट्रवादाचे वीस आमदार गळालाही लागले होते. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी नावावर एकमत न झाल्याने आणि काही वाचाळ नेत्यांमुळे आमचा डाव फसला. यात माझाही सहभाग होता. त्यानंतरच मला तेलगी प्रकरणात अडकविण्यात आले.

या पत्रात सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले आहेत. अनिल गोटे यांच्या या आरोपांमुळं विरोधी पक्षांना आयतं कोलीत मिळणार असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. 19 नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्षांना भेटून राजीनामा पत्र सादर करणार असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

VIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल

First published: November 13, 2018, 6:05 PM IST

ताज्या बातम्या