Home /News /maharashtra /

मंत्रिमंडळातून या नेत्याला बरखास्त करा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मागणी

मंत्रिमंडळातून या नेत्याला बरखास्त करा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या दालनात एक पत्र आलं आहे. हे पत्र अत्यंत धक्कादायक असं आहे.

    नागपूर, 23 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या दालनात एक पत्र आलं आहे. हे पत्र अत्यंत धक्कादायक असं आहे. हे पत्र सामान्य जनतेकडून नाही तर काँग्रेसच्याच (Congress) नेत्यानं केलं आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील मंत्री सुनील केदार (Sunil Kedar)यांच्याविरोधात हे पत्र लिहिलं आहे. विशेष म्हणजे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी हे पत्र (Letter) थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी सुनील केदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनिल केदार हे 2002 मध्ये नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खाजगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवले आणि बँकेचं 150 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप सुनिल केदार यांच्यावर आहे. या घोटाळ्याप्रकरणी केदार आणि इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यानं कोर्टात खटला दाखल केला आहे. Chandrapur: भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबासोबत अमानुष कृत्य; भरचौकात हातपाय बांधले अन्...  आशिष देशमुख यांची मागणी गेली 19 वर्ष हा खटला कोर्टात सुरु आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेश यांची नियुक्ती केली आहे. असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. असिफ कुरेशी या खटल्यात योग्य बाजू मांडू शकणार नसल्याचा आरोप करत त्यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी देशमुख यांनी केलीय. तसंच मंत्री सुनिल केदार यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Congress, Nagpur, Uddhav thackeray

    पुढील बातम्या