6 महिन्यांच्या चिमुरड्याचा कोरोनाविरुद्ध लढा, आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुमचे डोळे पाणावतील!

6 महिन्यांच्या चिमुरड्याचा कोरोनाविरुद्ध लढा, आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुमचे डोळे पाणावतील!

आपल्या तान्हुल्याला डिस्चार्ज मिळाल्याचा त्याच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता.

  • Share this:

रत्नागिरी, 25 एप्रिल: जिल्हा रुग्णालयातून शनिवारी सहा महिन्याच्या बाळाला डिस्चार्ज मिळाला. आपल्या तान्हुल्याला डिस्चार्ज मिळाल्याचा त्याच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारीही यावेळी आनंद व्यक्त केला. याचं कारण म्हणजे या बाळाच्या डिस्चार्जमुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर आली आहे. या बाळासह या रुग्णालयातल्या आणखी तिघांनाही डिस्चार्ज मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सध्या रत्नागिरीत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचं कौतुक होत आहे.

हेही वाचा...मुंबईत धोका कायम! प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ, 1000 चा आकडा पार

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शृंगारतळी गावात 19  मार्चला दुबईहून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि पोलिस प्रशासन झपाटून कामाला लागलं होतं. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे आणि कोरोनाचा फैलाव रोखणे, या कामाना प्राधान्य देत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु झाली. पण तरीही शहरापासून जवळच असपेल्या साखरतर गावात दोन महिला आणि एक सहा महिन्याचं बाळ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे रत्नागिरीची कोरोनाबाधीतांची संख्या सहा झाली होती.

हेही वाचा..कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही

रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गतही आता कोरोनाचा एकही रुगण नाही. असं असलं तरीही या दोन्ही जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात पुढचे आणखी काही दिवस अधिक काळजी घ्यावी लागेल, असं आरोग्य विभागाने  म्हटलं आहे. त्यामुळे या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकर आपली आणि इतरांचीही काळजी घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी या बाळाकडून नक्कीच  प्रेरणा घेतील, अशी प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 25, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या