Home /News /maharashtra /

पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाल्याने अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे

    पुणे, 11 मार्च : चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाल्याने अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना बाधित रुग्ण आढळून य़ेत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी केली आहे. संबंधित - कोरोनामुळे IPL वर टांगती तलवार, मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्ह्यात स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुण पूर्ण वेळ तैनात ठेवण्यात येईल. याशिवाय संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र्य रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष, मदत केंद्राची स्थापना, जास्त भावाने मास्क वा औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय लोकांसाठी 104 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुणेकरांना  कोरोना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 यावर संपर्क साधावा. संबंधित - कोरोनाची भीती; मुंबईच्या ओला ड्रायव्हरलाही संसर्ग, पुण्यात रुग्णांची संख्या 5 मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील 1,29,448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातऊन आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत.संबंधित - कर्नाटक, केरळात 'कोरोना'चे आणखी रुग्ण, भारतात व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या