मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

दीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

    पुणे,ता.23 जुलै : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी दणका दिला. सुप्रीम कोर्टाने दीपक मानकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावतानाच त्यांना १० दिवसांत पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेशही दिले आहेत. २ जून रोजी जितेंद्र जगताप यांनी घोरपडी येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगताप यांनी मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व अन्य काहींची नावे लिहीली होती. आपल्या आत्महत्येसाठी हे सर्व जबाबदार असल्याचे जगताप यांनी म्हटले होते. या आधारे पोलिसांनी मानकर आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली.

    दीपक मानकर हे पुण्यात कायम वादग्रस्त राहिले आहेत. सत्ताधारी पक्षाला हाताशी धरून साम-दाम-दंड नीतीचा वापर ही त्यांची खासियत आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दांडगाईची अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आली होती. पण प्रत्येक प्रकरणातून ते सहिसलामत सुटले. जवळपास सगळ्याच पक्षांचा वापर त्यांनी या दांडगाईसाठी केला आहे. तर मानकरांची दहशत असल्याने राजकीय पक्षांनी तात्कालीक फायद्यासाठी मानकरांचा वापर करून घेतला. या त्यांच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर फार मोठी कारवाई कधीच झाली नाही.

    हेही वाचा...

    VIDEO : ....आणि चर्चगेट स्टेशनमध्ये अवतरली पंढरी !

    आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन

    परभणीत मराठा कार्यकर्ते पेटले, पोलीस व्हॅनसह जाळल्या 6 बसेस

    Video- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा

    ऑनलाइन पार्टनर शोधताय... मग या गोष्टी नक्की वाचा

    First published:

    Tags: Suicide case, Supreme court, सुप्रीम कोर्ट