Home /News /maharashtra /

success story : अपंगत्वावर मात करत दीक्षा दिंडेने मिळवली ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप; वाचा तिच्या जिद्दीची कहाणी

success story : अपंगत्वावर मात करत दीक्षा दिंडेने मिळवली ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप; वाचा तिच्या जिद्दीची कहाणी

title=

पुण्यातील दीक्षा दिंडे हिला नुकतीच ब्रिटिश सरकारची ( British Government Scholarship ) प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिप ( Chevening Scholarship ) मिळाली आहे. जगभरातील 68 हजार विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला होता. यामध्ये दीक्षा दिंडेची निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 5 जुलै : कात्रजच्या सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणाऱ्या दीक्षा दिंडे या दिव्यांग तरुणीची ब्रिटिश सरकारच्या 'चेवनिंग स्कॉलरशिप'साठी ( Chevening Scholarship ) नुकतीच निवड झाली आहे. ब्रिटिश सरकारची ( British Government Scholarship ) प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिप ही अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे. ज्या मुलांची आर्थिक परीस्थिती चांगली नाही अशा मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते. जगभरातील 68 हजार विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला होता. यामध्ये जगभरातील फक्त एक ते दीड हजार विद्यार्थ्यांची निवड होणार होती आणि त्यामध्ये दीक्षा दिंडे देखील निवड झाली आहे. दीक्षा दिंडे ही जन्मजात दिव्यांग आहे. मात्र, तरीही तिने आपल्या या अपंगत्वाचा बाऊ न करता आपले आतापर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच गेल्या 7 ते 8 वर्षापासून ती सामाजिक क्षेत्रात अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आहे. यामध्ये मुख्यत्वे दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना सार्वजनिक जीवनात सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांवरती दीक्षा लढा देत आहे. तसेच ती अनाथ विद्यार्थ्यांसाठी देखील काम करत आहे. हे तिचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन या स्कॉलरशिपसाठी तिची निवड झाली आहे. वाचा : 'आमच्यासोबत 115 आमदार, पण...', मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीसांचं मोठं विधान स्कॉलरशिपद्वारे मिळणार 45 ते 50 लाख रुपये  या स्कॉलरशिपमध्ये फक्त सामाजिक कार्य नव्हे तर तिची बुद्धिमत्ता आणि समाजाप्रतीची जाण या सर्वांचा अंतर्भाव या स्कॉलरशिपमध्ये विचारात घेतला होता. या स्कॉलरशिपसाठी 2 परीक्षा आणि इंटरव्यूद्वारे तिची निवड झाली. या स्कॉलरशिपद्वारे तिला तब्बल 45 ते 50 लाख रुपये तिच्यासाठी उपलब्ध होणार असून ती पुढील शिक्षणासाठी बाहेर देशांमध्ये 1 वर्षासाठी जाणार आहे. या सर्वांचा खर्च या स्कॉलरशिपद्वारे करून दिला जाणार आहे. भविष्यामध्ये दीक्षाला सामाजिक क्षेत्रात काम करायचे आहे आणि त्यासाठी तिला ही स्कॉलरशिप अतिशय महत्त्वाची ठरली. दीक्षा दिंडे सांगते की, "मुलाखती दरम्यान एक प्रश्न विचारला गेला. तुझ्या व्यक्तिमत्त्वावर ज्या व्यक्तींचा प्रभाव आहे अशा 'लीडर्स' बद्दल बोल. उत्तर देताना तोंडातून फक्त दोन व्यक्तींची नावे पडली. एक सावित्रीमाय, जिच्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊ शकतेय आणि दुसरी म्हणजे आई. जिने कधीच हार मानून माझी साथ सोडली नाही. हे उत्तर कोणाला कँव्हिंस करण्यासाठी नव्हतंच मुळी. रिझल्ट लागल्यावर आईकडे बघून जे समाधान मिळालय अथवा तिने काय कष्ट घेतलेत, ते मी कोणत्याच शब्दात सांगू शकत नाही."
    First published:

    Tags: Pune, Pune news, Scholarship

    पुढील बातम्या