महाराष्ट्राला मिळणार का मोफत वीज? महाआघाडीत विजेवरून पडणार ठिणगी

महाराष्ट्राला मिळणार का मोफत वीज? महाआघाडीत विजेवरून पडणार ठिणगी

राज्यातल्या जनतेला मोफत वीज देण्याबद्दल गेले 15 दिवस सातत्याने महाविकास आघाडतल्या दोन मंत्र्यांमध्ये दोन टोकाची मतं असल्याचं पुन्हा पुन्हा पुढे येत आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मार्च : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे 90 दिवस पूर्ण होत असतांनाच या सरकारमधल्या मंत्र्यांमध्येच काही महत्त्वाच्या विषयावरून मतभेद असल्याचं पुन्हा एकदा पुढे आलं आहे. यामध्ये मोठा विषय आहे तो मोफत वीज देण्याचा. राज्यातल्या जनतेला मोफत वीज देण्याबद्दल गेले 15 दिवस सातत्याने महाविकास आघाडतल्या दोन मंत्र्यांमध्ये दोन टोकाची मतं असल्याचं पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. राज्यात १०० युनिट्स पर्यंत वीज मोफत देता येईल का याविषयी ३ महिन्यात अहवाल येणार. त्या अहवालावर मोफत वीजेविषयी निर्णय घेणार, असं उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत सांगितलं. यामुळे पुन्हा एकदा मोफत विजेचा मुद्दा सुरू झाला आहे. पण मोफत वीज देणं वाटतं तेवढं नक्कीच सोप नाही.

कधी झाली सुरुवात?

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तारूढ झाला. यानंतर राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधला  सहकारी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीच्या अबू असीम आझमी यांनी सगळ्यात आधी, 'महाराष्ट्रा सुद्धा वीज मोफत दिली पाहिजे' अशी मागणी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी आझमी यांच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज मोफत देण्याबद्दल सकारात्मकता दाखवली होती. सध्याच्या थकबाकीचा आणि वसुलीचा आढावा घेऊन राज्यात वीज माफी लागू करण्याचा सकारात्मक विचार करु असं राऊत म्हणाले होते.

काँग्रेसचा पाठिंबा, राष्ट्रवादीचा विरोध

स्वत: उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जरी वीज मोफत देण्याबद्दल सकारात्मकता दाखवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या मागणीला ठामपणे विरोध केला आहे. शिवाय सत्तेचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेने सुद्धा याबद्दल सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, 'राज्याच्या आर्थिक परिस्तितीचा विचार करता काहीही मोफत देणं परवडणारं नाही. वीज मंडळाला असलेला तोटा पाहाता तर न पेलवणारी आश्वासनं देऊच नयेत' असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज मोफत द्यायला ठामपणे विरोध केला आहे.  अजित पवार यांच्या आग्रही विधानानंतरही नितीन राऊत, 'राज्यात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यासाठी अहवाल आल्यानंतरच निर्णय घेऊ' असं ठामपणे सांगत आहेत. आधीच मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. त्यातच मोफत वीजेच्या मुद्यावर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचं दिसत आहे.

कोरोनाचा धोका वाढला ! भारतात एकूण 6 रुग्ण, आणखी 6 जणांना व्हायरस झाल्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

Tags:
First Published: Mar 3, 2020 09:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading