Dhule ZP Election Result: काँग्रेसचा गड उद्ध्वस्त, धुळ्यात पहिल्यांदा फुलले भाजपचे 'कमळ'

Dhule ZP Election Result: काँग्रेसचा गड उद्ध्वस्त, धुळ्यात पहिल्यांदा फुलले भाजपचे 'कमळ'

भाजपने बहुमताचा आकडा 29 गाठून 31 जागा मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.

  • Share this:

दीपक बोरसे,(प्रतिनिधी)

धुळे,8 जानेवारी: धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने पहिल्यांदा धुळ्यात निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातही भाजप आघाडीवर आहे. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार जयकुमार रावल याच्याकडे देण्यात आली आहे. भाजपने जिल्ह्यात विधानसभे पेक्षा मोठे यश मिळवले आहे. एकूण 56 पैकी 38 जागा भाजपने पटकावल्या आहेत.

धुळे जिल्हा परिषद अंतिम निकाल

एकूण जागा - 56

निकाल जागा - 55 (1 निकाल राखीव)

भाजप - 38

काँग्रेस - 07

शिवसेना - 4

राष्ट्रवादी काँग्रेस - 3

अपक्ष - 3

(राखीव जागेचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे, पण तो राखीव ठेवण्यात आला आहे.)

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा पराभव...

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांचा कुसुंबा गटातून पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार संग्राम पाटील यांनी किरण शिंदे यांचा पराभव केला आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा गटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

धुळ्यात अनिल गोटेंविरुद्ध भाजप

जिल्हा परिषदेच्या 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत. धुळे जिल्हा परिषद निवडणूक भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्यासह नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे, तसंच धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जबाबदारी गोटेंच्या खांद्यावर सोपवल्यामुळे या निवडणुकीत गोटे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री असाच सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक मतदान

धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायती समित्यांसाठी मंगळवारी मतदान झाले. यात धुळ्यात सरासरी 66 टक्के तर नंदुरबारला 67.23 टक्के मतदान झाले. शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 70 टक्के मतदान झाले. कापडणे, न्याहळाेद, कासारे, दिघावे येथे सायंकाळी मुदतीत केंद्राच्या आवारात असलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली. त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू हाेती.

जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 51 गट आणि धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा पंचायत समितीच्या 112 पैकी 109 गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्हाभरातील 1 हजार 255 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात एकूण 11 लाख 71 हजार 184 मतदार आहेत. त्यापैकी सरासरी 66 टक्के मतदारांनी सायंकाळपर्यंत मतदान केले.

तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी

धुळे- 65 टक्के

शिंदखेडा- 70 टक्के

शिरपूर- 62 टक्के

साक्री- 63 टक्के

नंदूरबार- 67.72 टक्के

अक्कलकुवा- 72.26 टक्के

धडगाव 64.66 टक्के

तळाेदा 65.82 टक्के

शहादा 63.48 टक्के

नवापूर 69.99 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 02:02 PM IST

ताज्या बातम्या