धुळे, 15 ऑक्टोबर : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन तरूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील विंचुर गावातील संदीप भास्कर पाटील या तरूण शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली, तर आंबोडे गावातील संदीप सरग या 22 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
संदीप भास्कर पाटीय यांच्यावर राष्ट्रीकृत बॅकेचे कर्ज होते. कर्जमाफीच्या योजनेत पात्र होण्यासाठी त्यांना दोन लाखाहुन अधीकची रक्कम लागणार होती. खरीप हंगामात कापूस चांगला पीकेल या आशेवर ते होते. मात्र, पावसाने दगा दिला आणि पीक भुईसपाट झाल्याने संदीप यांनी शेतातच गळफास लावून जीवन संपवलं.
दुसरी घटना जिल्ह्यातील आंबोडे या गावात घडली. या गावातील रहिवीसी संदीप सरग या 22 वर्षीय शेतकऱ्याने फवारणी करण्याचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. यंदा संदीपने शेतात कपाशी लावली होती. मात्र पाऊस कमी झाल्याने कपाशीचे पीक जळाले. त्यामुळे नैराशेच्या गर्तेत अडकलेल्या संदीप सरग फवारणी करण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवली.
दु्ष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतरी मृत्यूला कवटाळत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र असल्याची प्रतिक्रिया गोकुळ पाटील या गावकऱ्यांनी न्यूज18 लोकमतला दिली.
तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ambode, Dhule, Sandeep Bhaskar Patil, Sandeep Sarag, Suicide, Two young farmers, Vinchur