धुळे, 18 ऑक्टोबर: धुळे जिल्ह्यातील बोराडी गाव शिवारात कापसाच्या शेतात अवैधरीत्या गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. शिरपूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून केलेल्या शेतकऱ्याला रंगेहाथ अटक केली.
डोंगरसिंग पावरा याच्यासह दोघांविरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या गांजाची झाड जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा...जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, समोर आली डोकं सून्न करणारी माहिती
वनजमिनीवरच पिकवला गांजा...
शिरपूर तालुक्यातील एकलव्य पाडा शिवारात वनविभागाच्या वनजमिनीवर गांज्याची शेती होत असल्याची गोपनीय माहिती सहाययक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह शेतात छापा टाकला. यावेळ एका शेतात कपाशी पिकाच्या मध्यभागी गांजाच्या पिकांची लागवड केली होती. शेताच्या मध्यभागी गांजाची झाड लावून त्याच्या आजूबाजूला अन्य पिकांची लागवड केल्याचं कारवाईत समोर आलं आहे.
याबाबत मादक पदार्थ अधिनियम (NDPS)अंतर्गत शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिरपूर तालुका अमली पदार्थांचे तस्करी केंद्र बनला असल्याचं पुन्हा एकदा या कारवाईवरून स्पष्ट झाला आहे.
याआधीही झाली आहे मोठी कारवाई...
दरम्यान, शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात याआधीही धुळे पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी सुमारे 2 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त केला होता. आदिवासी शेतकऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यानं पोलिसही हादरले होते. लाकड्या हनुमान परिसरातील शिवारात मांगिलाल बारकु पावरा याच्या शेतात मोठ्या संख्येने अवैद्यरित्या गांजा साठवून ठेवला होता. याबाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुंधवंत यांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळावर छापा टाकला होता. यावेळी एका झोपडीत प्रति 30 किलो वजनाच्या गांजाच्या 128 गोण्या भरून ठेवलेल्या आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी कारवाई करत सुमारे 3904 किलो गांजा जप्त केला आहे.
हेही वाचा..जरा पहा ना ठाकरे साहेब, शेतकरी मरणाच्या दारात... VIDEO पाहून तुम्ही व्हाल भावुक
दरम्यान, शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र व मद्य प्रदेश सीमा रेषेला लागून असलेल्या गाव पाड्यांसाह वन शिवारात नेहमीच स्पिरिट, भांग, गांजा, सारख्या अमली पदार्थांच्या तस्करी होत असते. हे आज झालेल्या कारवाईवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जप्त करण्यात आलेला गांजा हा काळ्या बाजारात सुमारे साडे पाच हजार किलो इतक्या दराने विकला जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.