मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुळेकर गारठले..पारा घसरला, 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

धुळेकर गारठले..पारा घसरला, 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

कडाक्याच्या थंडीसह गार वाऱ्यांमुळे घराबाहेर निघणे अवघड झाले आहे.

कडाक्याच्या थंडीसह गार वाऱ्यांमुळे घराबाहेर निघणे अवघड झाले आहे.

कडाक्याच्या थंडीसह गार वाऱ्यांमुळे घराबाहेर निघणे अवघड झाले आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
धुळे,10 जानेवारी: बोचऱ्या थंडीने धुळेकर गारठले आहेत. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. धुळ्यात 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीसह गार वाऱ्यांमुळे घराबाहेर निघणे अवघड झाले आहे. बोचऱ्या थंडीचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तापमान 10 अंश सेल्सिअसखालीच आहे. दरम्यान, राज्यामध्ये तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तपमानात वाढ झाली होती. ओझर 6.6 तर निफाड 8.8 अंश सेल्सिअस तापमान नाशिक जिल्ह्यात आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने किमान तपमानात घट झाल्याने कडाक्याची थंडीमुळे जिल्हावासीय गारठले आहे. ओझरला राज्यात निचांकी 6.6 तर नाशिक शहरात 10.2 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरवासीय सूर्यप्रकाशात उभे रहात होते. मात्र, आकाश स्वच्छ असल्याने काही वेळातच उन्हाचा चटका बसत होता. मध्य महाराष्ट्रातमध्ये वातावरण कोरडे असल्याने किमान आणि कमाल तपमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात किमान तपमानाचा पारा सर्वाधिक घसरला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर गारवा जाणवत होता. मध्यप्रदेश आणि हरियाणामध्ये गोलाकार वाऱ्याची स्थिती असल्याने महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बुधवार रात्रीपासून ढगाळ वातावरण नाहीसे होऊन आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाले. त्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये पारा घसरला होता. गुरुवारी दिवसभर वातावरणात गारवा असल्याने नागरिकांना उबदार कपडे परिधान करण्याला पंसती दिली होती. असा राहणार अंदाज मध्य महाराष्ट्रामध्ये आकाश स्वच्छ आणि निरभ्र रहाणार असल्याने किमान तपमानात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
First published:

Tags: Cold temperature, Coldest place, Dhule news, Latest news, Lowest temperature, North maharashtra

पुढील बातम्या