दिपक बोरसे, धुळे 9 डिसेंबर : भाजपा बंडखोर आमदार अनिल गोटेची ऐन मतदानाच्या दिवशी प्रकृती खराब झाली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी शनिवारी रात्री त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती, आमदार अनिल गोटे हे त्यावेळी गाडीत नव्हते. त्यानंतर त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोटे यांना अस्थम्याचा त्रास आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लोकसंग्राम या पक्षाच्या नावावर निवडणुक लढली होती.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, लोकसंग्राम, MIM, समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात हे पक्ष समोरासमोर आहेत. मुख्य लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी होणार आहे. तर दुसरीकडे, भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्राम या पक्षाच्या तिकिटावर स्वतंत्र उमेदवार उभे करून त्यांनी भाजपला चांगलंच आव्हान दिलंय.
ही निवडणूक भाजपाचे धुळे महापालिका निवडणुकीचे प्रभारी आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे ह्या प्रभाग क्र 5 मधून स्वतः उमेदवारी करीत आहेत तर प्रभाग क्र. 1 मधून आमदार गोटे यांचा मुलगा तेजस गोटे लोकसंग्रामच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
धुळे महानगर पालिका निवडणुकीत 19 प्रभागातील 73 जागांसाठी आज मतदान होत आहे.
महापालिकेच्या 73 जागांसाठी 355 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपा- 62 उमेदवार
काँग्रेस- 22 उमेदवार
राष्ट्रवादी- 45 उमेदवार
शिवसेना- 48 उमेदवार
लोकसंग्राम--2 + 60
समाजवादी -10
MIM - 12 उमेदवार
राष्ट्रीय समाज पक्ष -12 उमेदवार
संभाजी बिग्रेड - 2
मनसे - 1
बसपा - 9 उमेदवार
भारतीय बहुजन महासंघ - 5 उमेदवार
VIRAL VIDEO: कुख्यात गुंडाचा बारबालांसोबत 'तमंचे पे डिस्को'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.