धुळे पालिका निवडणूक, मंत्र्यांच्या प्रचारसभेतली वीज चोरी उघड!

धुळे पालिका निवडणूक, मंत्र्यांच्या प्रचारसभेतली वीज चोरी उघड!

राज्य आणि केंद्रातले महत्वाचे मंत्री प्रचारासाठी आले असताना प्रचारसभेसाठी वीज चोरी कशी होऊ शकते असा सवाल नागरिकांनी केलाय.

  • Share this:

दिपक बोरसे, धुळे, 2 डिसेंबर : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीर सभेमध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीत वीज चोरीचा प्रकार समोर आलाय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची प्रभाग क्रमांक एक मध्ये जाहीर सभा ठेवण्यात आली होती, यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे ह देखील उपस्थित होते. या जाहीर सभेसाठी एक मोठा जनरेटर आणण्यात आला होता, मात्र मुख्य मंचावर प्रकाश टाकणारे फोकस हे वीज चोरी करून लावण्यात आले होते. सभा सुरू असलेल्या इमारतीच्या वरून जाणाऱ्या वीजेच्या तारांवर आकडे टाकून त्यासाठी वीज घेण्यात आली होती.

धुळे महापालिकेची निवडणूक ही भाजपा विरूद्ध सर्व अशी झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे देखील भाजप विरोधात वेगळी चूल मांडत निवडणूक रणधुमाळीत उतरल्याने भाजपाला विरोधकांसोबत स्वकीयांच्याही विरोधाचा सामना करावा लागत आहे.

आमदार गोटे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि अन्य सर्व पक्ष धुळ्यात भाजपवर टीका करत आहेत. त्यामुळे महापालिकेची निवडणूक भाजप विरूद्ध एकवटलीय. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडीला प्रमुख आव्हान भाजपचेच आहे. भाजपनं शहर विकासात आडकाठी आणल्याचा आरोप आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजवर्धन कदमबांडे यांनी केलाय.

राज्य आणि केंद्रातले महत्वाचे मंत्री प्रचारासाठी आले असताना प्रचारसभेसाठी वीज चोरी कशी होऊ शकते असा सवाल नागरिकांनी केलाय. महत्वाचे लोक येणार होते हे माहित असूनही संयोजकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती अस भाजपच्या काही नेत्यांनी स्पष्ट केलं.

 

संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल

First published: December 2, 2018, 12:24 PM IST

ताज्या बातम्या