मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावनंतर धुळे, निवडणुकीतला 'महाजन पॅटर्न'

जळगावनंतर धुळे, निवडणुकीतला 'महाजन पॅटर्न'

 या विजयाचे श्रेय हे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलं जातं आहे

या विजयाचे श्रेय हे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलं जातं आहे

या विजयाचे श्रेय हे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलं जातं आहे

    10 डिसेंबर : जळगाव पाठोपाठ भाजपने धुळ्यातही ऐतिहासिक विजय मिळवला.  या विजयाचे श्रेय हे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलं जातं आहे. गिरीश महाजन यांच्या निवडणूक नियोजनामुळे 'महाजन पॅटर्न' उदयास आला आहे.

    मोदी लाटेवर स्वार होत भाजपने एक-एक करत अनेक राज्यात कमळ फुलवलं. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं पालिका निवडणुकीपासून ते पंचायत निवडणुकांत विजय मिळवला. खास करून खान्देशात भाजपची मदार फक्त ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर होती. पण मंत्रिपदावरून पायउतार झाल्यामुळे खडसे बाजूला सारले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतल्या गिरीश महाजन यांना जळगावची जबाबदारी सोपवली. महाजनांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळत जळगावात ३५ वर्ष गाजवणाऱ्या सुरेशदादा जैन या आपल्या गुरूच्या गडाला सुरुंग लावून सत्ता काबीज केली.

    या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी धुळ्याची जबाबदारीही महाजनांवर सोपवली. धुळ्यात जबाबदारी दिल्यामुळे भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांना रुचलं नाही. त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आणि भाजपला रामराम ठोकला.

    भाजपच्या घरात भांडणं पेटल्यामुळे विरोधकांनीही याची गंमत पाहण्याची भूमिका घेतली. परंतु, महाजनांनी सर्व ताकदपणाला लावून जळगाव फाॅर्म्युला इथं राबवला.जे जे इच्छूक उमेदवार आहे त्या सर्वांना भाजपकडून तिकिटं देण्यात आली. यात सर्वपक्षीय आयारामांचा समावेशही होता. त्यामुळे हा फाॅर्म्युला इथं कामी आला.

    भाजपने 50 जागा जिंकून एकहाती सत्ता राखली. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला फक्त 3 जागा आल्या होत्या. 3 जागांवर भाजपने थेट 47 जागांची कमाई करत पालिकेवर झेंडा फडकवला.

    जेव्हा मतमोजणी सुरू होती तेव्हाच गिरीश महाजन यांनी 43 हुन अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. त्यांचा हा दावा खरा ठरला. धुळ्यातल्या या विजयामुळे भाजपच्या गोटात एकच जल्लोष सुरू झाला आहे.

    विरोधकांचे आव्हान तर आहेच पण पक्षाचही बंडोबांना थंड करून विजय मिळवण्याचा करिष्मा महाजनांनी करून दाखवला आहे. या विजयामुळे आगामी निवडणुकीत बंड पुकारण्याच्या भात्यातून एकाप्रकारे हवाच काढून घेण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्या या विजयी खेळीमुळे खान्देशात आणि राज्याच्या निवडणुकीत 'महाजन पॅटर्न' तयार झाला आहे.

    या विजयामुळे गिरीश महाजन यांचे पक्षात वजन वाढणार हे साहजिकच आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री  फडणवीस आता महाजनांवर पुढे कोणती जबाबदारी सोपवतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

    ================================

    First published:
    top videos

      Tags: Anil gote, Dhule, Dhule municipal election, Girish mhajan