मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खान्देशात एमआयएमची एंट्री, धुळ्यातही उघडलं खातं!

खान्देशात एमआयएमची एंट्री, धुळ्यातही उघडलं खातं!


जळगाव महापालिकेत 3 आणि आणि धुळे महापालिकेत 2 जागा मिळाल्यामुळे खान्देशात एमआयएमच्या 5 जागा झाल्या आहेत.

जळगाव महापालिकेत 3 आणि आणि धुळे महापालिकेत 2 जागा मिळाल्यामुळे खान्देशात एमआयएमच्या 5 जागा झाल्या आहेत.

जळगाव महापालिकेत 3 आणि आणि धुळे महापालिकेत 2 जागा मिळाल्यामुळे खान्देशात एमआयएमच्या 5 जागा झाल्या आहेत.

    10 नोव्हेंबर :भारिप आणि एमआयएम युतीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं आहे. आज धुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमने दोन जागेवर विजय मिळवत खान्देशात दाखल झाली आहे.

    आंध्रची सीमा ओलांडून एमआयएम पक्ष नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला पण आता या पक्षानं थेट उत्तर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत एमआयएमने पहिल्यांदाच तीन जागा पटकावल्या होत्या.

    खासदार असाउद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन 2012 साली नांदेड महापालिका निवडणुकीतून महाराष्ट्रात एंट्री केली होती. त्यानंतर लातूर, औरंगाबाद आणि मुंबई पालिकेसह विधानसभेत धडक मारली.

    आज धुळे महापालिका निवडणुकीत दोन जागा एमआयएमने पटकावल्या आहे. प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक ३ डमधून एमआयएमचे दोन उमेदवार विजयी झाले. प्रभाग ३ मधून नाजीयाबानो पठाण या 918 मतांनी आणि प्रभाग क्रमांक ३ ड मधून हाशम बेग सईद बेग 3891 मतं मिळवून विजयी झाले.

    जळगाव महापालिकेत 3 आणि आणि धुळे महापालिकेत 2 जागा मिळाल्यामुळे खान्देशात एमआयएमच्या 5 जागा झाल्या आहेत.

    पण एमआयएमची उत्तर महाराष्ट्रात एंट्री जरी घेतली असली तरी पुढे पाठ मागे सरसपाट अशीच अवस्था आतापर्यंत पालिका निवडणुकीत एमआयएमची झाली आहे. ज्या नांदेड महापालिकेतून एमआयएमने एंट्री घेतली होती त्याच नांदेड पालिका निवडणुकीत मागील वर्षी एमआयएमचा सुपडासाफ झाला होता. तसंच मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपले मुस्लीम मतदार पक्षांसोबत ठेवण्यास यश मिळालं. पक्षाला या निवडणुकीत २.५५ टक्के म्हणजे १ लाख २७ हजार ७४० मतं मिळाली होती. एमआयएमनं ५९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यातल्या कित्येक जणांचे डिपाॅझिटही जप्त झाले. सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे काँग्रेसचे विजयी झाले होते. जळगावात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. याचा फायदा नक्कीच एमआयएमला झालाय. काँग्रेसला मतदान न करणाऱ्या मतदारांनी एमआयएमच्या पारड्यात आपली मतं टाकली.

    आता राज्यात भारिपसोबत युती करून एमआयएम आगामी निवडणुकांची तयारी करत आहे.

    =============================

    First published:
    top videos

      Tags: Dhule, Dhule municipal election, MIM