धुळ्यात महापौर पदासाठी चुरस, हे आहेत प्रबळ दावेदार!

धुळ्यात महापौर पदासाठी चुरस, हे आहेत प्रबळ दावेदार!

धुळ्यात अनेक दिग्गज नगरसेवक महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं यापदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • Share this:

दिपक बोरसे, 12 डिसेंबर : धुळ्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महापौर निवडीसाठी वेळ असला तरी मात्र नगरसेवकांच्या नावांची चर्चा सुरू झालीय. यात वाली बेन मंडोरे, प्रतिभा चौधरी, शितल नवले, हर्ष रेलन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यात शितल नवले यांचं पारडं सर्वात जड आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवलं.  भाजपच्या  विजयामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे बंड पुकारून भाजपविरोधात थंड थोपटणारे अनिल गोटे यांचं पुरतं पानिपत झालं.

धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत कायम राहिली. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत बहुमताचा जादुई आकडा पार केला. भाजपने एकहाती सत्ता राखल्यामुळे भाजपने एकच जल्लोष सुरू केला.

विशेष म्हणजे, भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला होता. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. गोटे यांनी आपल्या घरात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटेला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं. पण धुळेकर जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकत अनिल गोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं.

अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. मतदारांच्या कौलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवरुन खाली उतरावं लागलं. काँग्रेसला 6 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 जागा आल्यात. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने 34 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु, या वेळी राष्ट्रवादीला एकेरी आकडाही गाठता आला. काँग्रेसच्याही 2 जागा कमी झाल्या आहेत.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही इथं फार मोठा करिश्मा दाखवता आला नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा आल्या होत्या. यावेळी शिवसेनेला फक्त 1 जागा मिळाल्यात. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या एमआयएम पक्षाने 4 जागेवर विजय मिळवत खान्देशात पाऊल टाकलं आहे. बसपा, समाजवादी पक्षाने आपला गड कायम राखत अनुक्रमे 1 आणि 2 जागा जिंकल्यात. इथं मात्र, समाजवादी पक्षाला एका जागेचा फटका बसला.

धुळे महानगरपालिका निवडणूक अंतिम निकाल

भाजप - 50

शिवसेना- 01

काँग्रेस - 06

राष्ट्रवादी -08

लोकसंग्राम - 01

एम आय एम - 04

समाजवादी पार्टी- 02

बसपा- 01

====================

ईशाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात सगळ्या अंबानी कुटुंबीयांनी केला परफॉरमन्स

First published: December 12, 2018, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading