धुळ्यात धनशक्तीचा विजय, मतांसाठी 50 ते 1 लाख वाटले, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

धुळ्यात धनशक्तीचा विजय, मतांसाठी 50 ते 1 लाख वाटले, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

ते. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. तब्बल 332 मिळवून अमरीश पटेल यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.

  • Share this:

धुळे, 03 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) स्थापन झाल्यानंतर पहिल्याच स्थानिक निवडणुकीला सामोरं जात आहे. धुळ्यात विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत (Dhule Legislative Council by-election)  भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. पण, भाजपचा हा विजय धनशक्तीच्या जोरावर आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे.

न्यूज18 लोकमतशी बोलत असताना अनिल गोटे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.  'धुळे विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजप उमेदवार अमरीश पटेल हे धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. त्यांनी प्रत्येक मताला 50 हजार ते 1 लाख भाव दिला होता, असा आरोप गोटे यांनी केला आहे.

मालेगाव ब्लास्ट: प्रज्ञासिंह ठाकूर गैरहजर, सर्व आरोपींना दिले 'हे' निर्देश

'हा महाविकास आघाडीचा पराभव आहे. पण अमरीश पटेल जरी भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष शासन चालवतात. पैश्यांचा वापर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्रास केला जात आहे, असंही  अनिल गोटे म्हणाले.

तर, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली 50 टक्के मतंही राखू शकली नाही.  यावरून उद्याचं महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय राहील, हेच स्पष्ट होत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

'या' फोटोतली चूक शोधायला 99 टक्के लोक चुकले, तुम्ही शोधून पाहा जमतंय का?

धुळे नंदुरबार मधील अमरीश पटेल यांच्या विजयाने भाजपाची विजयाची शृंखला सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या 6 पैकी 6 जागा भाजप जिंकणार, असा विश्वास व्यक्त करतानाच तिन्ही पक्षी एकत्र येऊनही राज्यातील जनता भाजपच्या मागेच असल्याचे सिद्ध झाल्याचंही दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

अमरीश पटेल 332 मताधिक्यांनी विजयी

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं पडली आहे.

भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्त्व कुणाकडे असणार? शरद पवारांनी सांगितली 3 नावं!

437 पैकी 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी 99. 31 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. भाजपकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही थेट लढत कोण जिंकणार अशी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मतमोजणीत 4 मतं बाद करण्यात आली आहे. उरलेल्या 430 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. 216 प्रथम प्राधान्याची मतं घेणार उमेदवार जिंकणार असा कल होता.

पण, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मतदारांचा कौल हा भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांना मिळाला. तब्बल 332 मिळवून अमरीश पटेल यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 3:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या