सिगारेट ओढण्यास मनाई केल्याचा राग; संतप्त भाडेकरूने केली घरमालकाची हत्या

मेमाने यांच्या मुलाने राग मनात धरुन सकाळी श्रीराव यांचे घर गाठले. त्यावेळेस रमेश श्रीराव हे घराच्या गच्चीवर नेहमीप्रमाणे योगासने करत बसले होते.

मेमाने यांच्या मुलाने राग मनात धरुन सकाळी श्रीराव यांचे घर गाठले. त्यावेळेस रमेश श्रीराव हे घराच्या गच्चीवर नेहमीप्रमाणे योगासने करत बसले होते.

  • Share this:
धुळे, 22 जून : धुळे शहरातील राजहंस कॉलनीत (Rajhans Colony Dhule) राहणाऱ्या रमेश श्रीराव (Ramesh Shrirao) या निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. श्रीराव यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूच्या मुलानेच रागाच्या भरात खून करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी अजिंक्य मेमाणे (Ajinkya Memane) या 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. धुळे शहरातील मिल परिसरातील राजहंस कॉलनीत राहणारे मयत रमेश हिलाल श्रीराव हे बँकेचे निवृत्त कर्मचारी होते. एप्रिल महिन्यात ते सेवेतून निवृत्त झाले. ते सध्या राजहंस कॉलनीत स्थायिक झाले असून त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपले घर विश्वनाथ मेमाने यांना भाडेतत्वावर दिले. मेमाने यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन मुले वास्तव्यास आहेत. मेमाने यांचा मोठा मुलगा अजिंक्य हा कोपरगाव येथे बीसीएचे शिक्षण घेत आहे. तर लहान मुलगा मुक्ताईनगर येथे शिक्षण  घेत आहे. कोरोना महामारीमुळे अजिंक्य तीन-चार महिन्यांपासून येथे घरीच होता. विशेष म्हणजे तो घरमालक श्रीराव यांच्यासोबत रोज पहाटे मॉर्निंग वॉकला जात असे. धक्कादायक! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून वाद; मंडपात हळदीच्या जागी पडला रक्ताचा सडा शिवनाथ मेमाने हे घरात असताना सिगारेट ओढत असत. त्यामुळे घरमालक श्रीराव त्यांच्यासह मेमाने कुटुंबाला सिगारेट ओढणे, उशिरा उठणे यावरून सतत बोलत असत. मेमाने यांचा मुलगा अजिंक्य याच नेहमी श्रीराव यांच्याकडे येणं जाण होतं. श्रीराव हे मेमाने कुटुंबाला नेहमी उलट सुलट बोलत असतं. त्यात सिगरेट पिण्यास रागवल्याने त्या रागातून अजिंक्यने हे टोकाचे पाऊल उचलल्याच बोललं जात आहे. मेमाने यांच्या मुलाने त्याचा राग मनात धरुन सकाळी श्रीराव यांचे घर गाठले. त्यावेळेस रमेश श्रीराव हे घराच्या गच्चीवर  नेहमीप्रमाणे योगासने करत बसले होते. त्याच वेळेस अजिंक्य याने त्यांच्या डोक्यात लोखंडी फावडीने वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या करून गच्चीवरून खाली आल्यानंतर अजिंक्यने त्यांच्या पत्नीचा देखील गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात झटापट झाल्याने त्या त्याच्या तावडीतून सुटल्या आणि घराच्या गॅलरीत जावून त्यांनी आरडा ओरड केली. महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरीकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि मारेकरी तरुणाला पकडले. दरम्यान हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी अजिंक्यला ताब्यात घेतले असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published: