धुळे: सरपंच, उपसरपंचाचा अपघाती मृत्यू; गावकऱ्यांनी महामार्ग रोखला

धुळे: सरपंच, उपसरपंचाचा अपघाती मृत्यू; गावकऱ्यांनी महामार्ग रोखला

गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे साक्री सुरत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

  • Share this:

धुळे, 27 जानेवारी: जिल्ह्यातील दातर्ती गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे साक्री सुरत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दातर्ती - शेवाळे मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गावचे सरपंच सदाशिव बागुल आणि उपसरपंच गणेश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामागे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचा हात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संदिग्ध धडक देणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी आणि संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

सरपंच सदाशिव आणि उपसरपंच गणेश हे तरुण आणि धडाडीचे असल्याने त्यांनी दातर्ती परिसरात वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळेच त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

VIDEO : चालकाविना बाईक सुसाट, ८ जण जखमी

First published: January 27, 2019, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading