Home /News /maharashtra /

चोरट्यांनी पळवले चक्क ATM मशीन, अवघ्या तीन मिनिटांत काम फत्ते, समोर आला VIDEO

चोरट्यांनी पळवले चक्क ATM मशीन, अवघ्या तीन मिनिटांत काम फत्ते, समोर आला VIDEO

धुळे जिल्ह्यातील शिरूड गावात चोरट्याने चक्क संपूर्ण ATM मशीनसह सुमारे 14 लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे.

दीपक बोरसे (प्रतिनिधी), धुळे, 29 फेब्रुवारी: धुळे जिल्ह्यातील शिरूड गावात चोरट्याने चक्क संपूर्ण ATM मशीनसह सुमारे 14 लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. शिरूड गावातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेचे ATM मशीन भल्या पहाटे चोरट्याने चोरून नेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या एटीम मशिनमध्ये सुमारे 14 लाखांची रोकड होती. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शाल पांघरलेल्या चार चोरट्यांनी ATM सेंटरमध्ये प्रवेश केला. यावेळी ATM मशीन न फोडता चक्क अख्ख मशीनच चोरट्यांनी पिकअप व्हॅनच्या मदतीने चोरून नेले आहे. दरम्यान, ATM मशीन चोरीचा हा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. विशेष म्हणजे शनिवार व रविवार दोन दिवस लागून सुट्या असल्याने शुक्रवारीच ATM मध्ये पैसे भरण्यात आले होते. त्यामुळे चोरट्यांनी ATM वर पाळत ठेऊनच ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. ATM चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण कुठेही दिसणार नाही, याची काळजी घेतली असून अट्टल गुन्हेगार असल्याचे बोलले जाते आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन जिल्हा पोलिस अधीक्षकांना रूजू होवून दोन दिवस होत नाही. तोच मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. हेही वाचा.. कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, संध्याकाळपर्यंत खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू नव्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना चोरट्यांची सलामी.. शिरूड गावातून चोरट्यांनी एटीएम लांबवल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, धुळे तालुका निरीक्षक दिलीप गांगुडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. शनिवारी पहाटे तीनच्या दरम्यान चार चोरट्यांनी पीकअप वाहनाच्या मदतीने एटीएम लांबवल्याची ही घटना घडली आहे. घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञासह श्वानाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांना रूजू होवून दोन दिवस होत नाही तोच मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. हेही वाचा..पैसे काढण्यापूर्वी हे वाचा, एटीएम मशिनमध्ये होणार आहे मोठा बदल अवध्या तीन मिनिटांत काम केले फत्ते... पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चेहऱ्यावर शाल झाकलेल्या एका चोरट्याने एटीएमच्या दालनात प्रवेश करीत वायररोप एटीएमला अडकवला. पीकअप व्हॅनच्या सहाय्याने एटीएम मशीन जमिनीतून उखडून काढत चोरत्यानी ATM चा काचेचा दरवाजा तोडत ATM मशीन बाहेर काढले. यावेळी अन्य तीन चोरटे पीकअपमध्ये एटीएम ठेवताना cctv कॅमेरात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे ATM चोरताना आपण cctv मध्ये दिसणार नाही, याची चोरट्यांनी विशेष काळजी घेतली आहे. हेही वाचा..शेतकरी संघटनांना मोदी सरकार देणार 15 लाख, बळीराजासाठी FPO ठरणार फायद्याचं
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: 200 burglary, Atm machine, Dhule crime, Dhule news, North maharashtra

पुढील बातम्या