धुळ्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं

धुळ्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं

. या अपघातात पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

  • Share this:

01 डिसेंबर : धुळे जिल्ह्यातील साक्री इथं एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील दार्तती गावाजवळ मुंबई फ्लाईंग क्लबचे विमान कोसळले.  विजेच्या तारांना विमान धडकल्याने हा अपघात झाल्याचं कळतंय. ही घटना रात्री उशीरा साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर पायलट जेपी शर्माने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला.

मात्र, जवळ कोणताही धावपट्टी नसल्यामुळे साक्री इथं दार्तती गावाजवळ शेवाळी फाट्याजवळ हे विमान कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत वैमानिकासह दोन जणांना किरकोळ दुखापत झालीये. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading