मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

15 फुटांवर नरभक्षक बिबट्याला ठार मारल्यानंतर धवलसिंह मोहिते झाले भावूक

15 फुटांवर नरभक्षक बिबट्याला ठार मारल्यानंतर धवलसिंह मोहिते झाले भावूक

'केळीच्या बागेत लपलेल्या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण, सेंकदाचाही विलंब न करता त्यांनी बंदुकीतून...'

'केळीच्या बागेत लपलेल्या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण, सेंकदाचाही विलंब न करता त्यांनी बंदुकीतून...'

'केळीच्या बागेत लपलेल्या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण, सेंकदाचाही विलंब न करता त्यांनी बंदुकीतून...'

पंढरपूर, 20 डिसेंबर : अहमदनगर, बीड आणि सोलापूर या 3 जिल्ह्यात थैमान घातलेल्या नरभक्षक बिबट्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी निशाणा करत ठार केले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. या बिबट्याने तब्बल बारा जणांचा बळी घेतला होता. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आल्यानंतर धवलसिंह मोहिते यांनी वडील प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत भावूक झाले. नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात तीन व्यक्तींना ठार केले होते. फुंदेवाडी येथील पुरुष, अंजनढोह येथील स्त्री आणि चिकलठाणा येथील 9 वर्षीय मुलगी असा तिघांचा बळी या बिबट्याच्या हल्ल्यात गेला होता. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर करमाळा येथील बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरे, सीसीटीव्ही कॅमेरे, शार्प शूटरही लावले होते. 3 वेळा या बिबट्याने शार्पशूटरना हुलकावणी दिली होती. उजनी काठ असलेल्या फळांच्या बागांमुळे बिबट्याने वन खात्याला सुमारे पंधरा दिवस हुलकावणी दिली होती. विशेष म्हणजे, 31 जानेवारी 2021 पर्यंतच या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. बिबट्याला जेरबंद, बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास अधिक मनुष्य हानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती. ही कार्यवाही करण्यास मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) औरंगाबाद आणि मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे यांच्या आदेशाने कर्मचारी काम करतील, असे सांगितले होते. पण वन विभागाकडून तिसऱ्या वेळीही बिटरगाव येथे बिबट्या ठार मारण्यात अपयश आले होते.  त्यामुळे बारामतीचे खासगी शार्पशूटर हर्षवर्धन तावरे व अकलूजचे डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांना पाचारण करण्यात आले. मोहिते-पाटलांच्या गोळ्यांनी घेतला बिबट्याचा वेध करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आले होते. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या केळीच्या बागेमध्ये असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर पुणे व बारामती येथून आलेल्या शार्पशूटर यांनी केळीच्या बागेला वेढा घातला होता. या शार्पशूटर पथकामध्ये अकलूज येथील धवलसिंह मोहिते पाटील देखील सामील होते. केळीच्या बागेत लपलेल्या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्य़ानंतर धवलसिंह यांनी पण पंधरा फुटावर असलेल्या नरभक्षक बिबट्याला गोळ्यांचे 3 फायर झाडत ठार केले. नरभक्षक बिबट्या ठार झाल्यानंतर  डॉ. धवलसिंह यांचे अकलूजमध्ये ढोल वाजवून आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. विज्ञान अवघड जातं; MLA आईच्या 10 वीच्या परीक्षेसाठी लेक झाली शिक्षिका मोहिते-पाटील घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे आणि जनसामान्यांच्या मनात प्रचंड आकर्षण आहे. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसहीत सर्वजण  त्यांची कार्यशैली, दबदबा, रुबाब आणि त्यांची निर्णयक्षमता यावर भरभरून बोलतात. नरभक्षक बिबट्या टिपल्यानंतर तुमच्या वडिलांनी कशी दाद दिली असती असे विचारल्यावर 'आज जर बाबा असते तर त्यांनीच माझ्या आधी तो टिपला असता' अशी भावूक प्रतिक्रिया डॉ. धवलसिंह यांनी दिली. कल्याणमधील फ्लॅटमध्ये सुरू होता सेक्स रॅकेट, 4 बांगलादेशी महिला अटकेत नरभक्षक बिबट्याचा बिमोड केल्यानंतर  'अकलूजच्या सिंहाने केला बिबट्याचा खात्मा' , अकलूजचे सिंह वाघ खेळवतातही आणि लोळवतात' अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. एकेकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व मोहिते-पाटील घराण्याकडे होते. संकटाला थेट सामोरे जाण्याची धमक असणाऱ्या प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा वारसा डॉ.धवलसिंह यांच्यात असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांची राजकीय कारकीर्द बहरली जावी, अशी आशा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
First published:

पुढील बातम्या