मुंबई, 28 मार्च : माजी खासदार संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील विकासकामांची झडती घेतली आहे. संभाजीराजे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची पाहणी केली. यावेळी तेथील अवस्था पाहून संभाजीराजेंनी संतापव्यक्त केला आहे. त्यांनी थेट तानाजी सावंत यांच्या राजानाम्याची मागणी केली आहे.
संभाजीराजे म्हणाले की, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा संवेदनाहीन व मग्रूर मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा स्वराज्य यामध्ये उतरेल… असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती "जैसे थे" आहे ! इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत. pic.twitter.com/aJCElQyW7u
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 28, 2023
आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा वाढदिवस अन् गौतमीचा राडा, Video पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या
माजी खासदार संभाजीराजे यांनी आरोग्यकेंद्राचा 1 मिनीटाचा व्हिडीओ केला आहे. यामध्ये त्यांनी रुग्णालयाची झालेली दुर्दशा तसेच रुग्णांची होणारी हेळसांड यासह अन्य सुव्यवस्थेच्या बाबा त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवल्या आहेत.
तानाजी सावंत यांचे खळबळजनक व्यक्तव्य
2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडनुका लढलो जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला माञ उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या असल्याचा डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितल आहे. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सांगितल होत. पण सावंत यांनी सत्ताबदलात फडणवीस यांचा हात असल्याचा सांगितल्याने यापूर्वी फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे.
'टोलनाके चालवणारे...', शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर घणाघात, साताऱ्यात पुन्हा दोन राजेंमध्ये संघर्ष
दरम्यान मला मंत्री पदावरून डावल्यावर धाराशिव जिल्हापरिषदमध्ये मी बिजीपी बरोबर सत्ता स्थापन करून बंड सुरू केले. मातोश्रीवर जाऊन हे सरकार बदल केल्याशिवाय शांत राहणार नाही. परत मातोश्रीचे तोंड ही बघणार नसल्याचे हे मातोश्रीवर जाऊन सांगून आल्याचे वकत्व तानाजी सावंत यांनी केले आहे. सावंत हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Sambhajiraje chhatrapati