...तर गुरुदक्षिणा ठरेल, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय यांची भावुक पोस्ट!

...तर गुरुदक्षिणा ठरेल, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय यांची भावुक पोस्ट!

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

  • Share this:

बीड, 03 जून : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत फेसबुकवर भावुक पोस्ट शेअर केली.

धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल भावनिक पोस्ट टाकली आहे.  'अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात. तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित - उपेक्षित दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळाली, त्यातून या गोरगरीब कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी काम करणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या अप्पा' अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

तसंच, 'येणाऱ्या काळात या गोर-गरीब -कष्टकरी, वंचित - उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले, तर तीच माझी तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली, नव्हे तर गुरुदक्षिणा ठरेल' असंही धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे गोपीनाथ गडावर गर्दी जमवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. पंकजा मुंडे यांनीही आपला बीडचा दौरा रद्द केला आहे. सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांनी घरीच राहून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असं आवाहन पंकजा मुडेंनी केलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 3, 2020, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading