बीड, 30 ऑक्टोबर : 'तुम्ही ज्यांनी त्यांनी आपली आपली ठेऊन बोलायला पाहिजे. तुम्ही याठिकाणी कुणाला खिश्यात ठेवतो, कुणाला वाचपाकिटामध्ये ठेवतो, ही भाषा चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य अध्यक्षाला शोभणारे नाही' असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde ) यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी आज बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय विभागाकडून राबवण्यात आलेल्या योजनेची माहिती दिली. यावेळी धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला.
'भाजपच्या नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की तुम्ही आम्हाला खिश्यात ठेवतील. तुम्ही ज्यांनी त्यांनी आपली आपली ठेऊन बोलायला पाहिजे. तुम्ही याठिकाणी कुणाला खिश्यात ठेवतो, कुणाला वाचपाकिटामध्ये ठेवतो, ही भाषा चंद्रकांत दादा पाटील यांच्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य अध्यक्षाला शोभणारे नाही' असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.
भिवंडी मेरे बाप की हैं' म्हणत टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
दरम्यान, सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या युवक युवतींना शिक्षण प्रशिक्षण या माध्यमातून सक्षमकरून त्यांना विविध क्षेत्रात उत्तम नोकरी व रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याच्या उद्देशाने राज्यात व्यापक स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.
बँकिंग, रेल्वे, एलआयसी, इत्यादि क्षेत्रातील नोकर्या तसेच पोलीस व मिलिटरी भरती आणि Aptitude Test वर आधारीत खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्कृष्ट नोकर्या करिता घेतल्या जाणार्या परीक्षांच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण राबविण्याकरिता दि. 28.10.2021 सामाजिक न्याय विभागाने शासन आदेश काढला. बार्टी पुणे यांना हे प्रशिक्षण राबविण्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे, असंही मुंडे यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पुणे जिल्ह्यातील तळेगांवमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना खिश्यात ठेवतो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य pic.twitter.com/s7YWppRmA6
'वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपाचा देखील नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहावं. परंतु, सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे. त्याची मलिकांनी जास्त टेस्ट घेऊ नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी असतो आणि अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यावर अन्याय होतो तेंव्हा समाज हा पाठीशी राहतोच हे नवाब मलिकांनी ध्यानात ठेवावं, अस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान नवाब मलिक रोज भाजपावर टीका करतात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी 'असे लोक मी खिशात ठेवतो' अशी देखील टिप्पणी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.