‘धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा’; औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

‘धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा’; औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

Setback For Dhananjay Munde : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठीनं दिले आहेत.

  • Share this:

औरंगबाद, सिद्धार्थ गोदाम, 11 जून : पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे. प्रकाश मेहता प्रकरणामध्ये सरकारला घेरण्याची रणनीती आखताना आता विरोधी पक्षनेत्याविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली म्हणून दिली होती. पण, हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करत जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. नियमानुसार इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. पण, दबाव आणून सदर जमिनीची खरेदी केल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, जमिन कृषक असताना ती अकृषक करून घेतल्याचं देखील याचिकाकर्त्यांनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे.  याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र तपासी अंमलदारांनी यामध्ये कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे रजाभाऊ फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली .औरंगाबाद खंडपीठाने तपासी अंमलदारावर देखील यावेळी ताशेरे ओढले आहेत. तसंच धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र, गुजरातला ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी

काय म्हणाले धनंजय मुंडेंचे वकील

धनंजय मुंडेंच्या वकिलांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील गुन्हा दाखल करण्याबाबतच्या निर्णयाला दुजोरा दिला. तसंच सदर जमिनीच्या 7/12 वर जमीन इनाम असल्याचा कुठलाही उल्लेख नसल्याचं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे.

भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

First published: June 11, 2019, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading