पंकजा यांच्यानंतर आता प्रीतम मुंडेंचा पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा, म्हणाल्या...

पंकजा यांच्यानंतर आता प्रीतम मुंडेंचा पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा, म्हणाल्या...

'पंकजाताई पालकमंत्री असताना जिल्ह्याला काही कमी पडलं नाही. आता फक्त श्रेयवादासाठी पुढे येत आहेत'

  • Share this:

बीड, 19 एप्रिल : बीडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये  (NCP) राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यानंतर आता खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

प्रीतम मुंडे यांनी आज आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

‘रजिस्ट्रेशन करुन देखील लस मिळत नाही’; बॉलिवूड अभिनेत्रीनं व्यक्त केली नाराजी

'मी जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कधी कमी पडणार नाही. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा असून आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळे या गोष्टीकडे सत्ताधाऱ्यांनी बघण्याची आवश्यकता असल्याचं देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितले.

तसंच, 'पंकजाताई पालकमंत्री असताना जिल्ह्याला काही कमी पडलं नाही. आता फक्त श्रेयवादासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची दुर्दैवी परिस्थिती असून आताच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.

पालकमंत्र्यांना फक्त माफियांचं हित माहीत, पंकजांचं टीकास्त्र

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच  बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका करत थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते.

कंगनाची 'धाकड'गिरी, सोशल मीडियावर उघड केली आई वडिलांची love Story

'बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्री यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे,' असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला होता. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्य सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले आहेत, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला होता.

'रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे. असं असताना जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र फक्त माफियांना मदत करत आहेत, त्यांना लोकांशी देणे घेणे नाही', असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता.

Published by: sachin Salve
First published: April 19, 2021, 6:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या