Home /News /maharashtra /

धनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी

धनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी

राज्यात पुन्हा एकादा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. आरक्षणासाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

बीड,22 फेब्रुवारी: राज्यात पुन्हा एकादा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. आरक्षणासाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू, असा धमकी वजा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 26 तारखेला 'सूंबरान' आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारत सोन्नर यांनी सांगितले आहे. बीड येथे आज राज्य स्तरीय धनगर समाजाच्या कोअर कमेटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत सोन्नर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत सोन्नर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 26 फेब्रुवारीला आझाद मैदानावर सूंबरान आंदोलन करण्यात येणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या यशवंत सेनेने आता आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवी मुंबईत कुजलेल्या अवस्थेत सापडल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या डेड बॉडीज धनगर आरक्षणाचा वनवास 70 वर्षांपासून सुरु आहे. तो तत्काळ आरक्षण देवून संपवावा. धनगर आणि धनगड या शब्दाच्या घोळामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. विरोधी पक्षात असताना आश्वासन दिले होते. आता ते पाळावे अन्यथा शेकडो लोक अधिवेशन कालवधीत आझाद मैदानावर सूंबरान आंदोलन करणार आहेत. तसेच या सरकारने धनगर आरक्षण प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी वजा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनचे हत्यार उपसले आहे. शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली का? नवाब मलिक यांनी केला खुलासा
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Udhav thackeray

पुढील बातम्या