सुरेश जाधव, बीड 11 जुलै : आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाची घोषणा करा नाही तर वारीत शेळ्या-मेंढ्या सोडू अशी धमकीच एका कार्यकर्त्याने दिलीय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांना आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा पहिल्याच कॅबिनेटमध्ये करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र आता पाच वर्षानंतरही ही घोषणापूर्ती होऊ शकली नाही असा आरोप विविध संघटनांनी केलाय.
पुण्यात भिंत कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जण थोडक्यात बचावले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या आषाढी एकादशीच्या महापूजेला विरोध करणार असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. धनगर समाज उन्नती मंडळ या संघटनेचा बीड जिल्हाअध्यक्ष असलेल्या रवी देशमुख यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांनी एक निवेदन दिलं असून फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल विचारला आहे. वेळोवेळी आंदोलन करूनही सरकारला जाग येत नाही. सरकार झोपेचं सोंग घेत आहे.
धक्कादायक ! मुंबईत 18व्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
धनगरांना आदिवासींच्या सवलती लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली होतं. मात्र धनगर समाजाला अद्यापही आदिवासींसारख्या सवलती लागू झालेल्या नाहीत. धनगर समाजाला आदिवासींसारखे घरकुलं देण्याची घोषणाही झाली होती त्याचीही अंमलबजावणी सरकारने केली नाही त्यामुळे आक्रमक भूमिका घेतं आहोत असं रवी देशमुख यांनी सांगितलंय.आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महा पूजा करू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.