धनगर आरक्षण आंदोलन पेटणार, प्रियंका गांधी, शरद पवार पंढरपूरला येणार

पंढरपूरात होणार असलेल्या अधिवेशनाला शरद पवार येणार असले तरी त्यांना बोलू देणार नाही असा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 10:03 PM IST

धनगर आरक्षण आंदोलन पेटणार, प्रियंका गांधी, शरद पवार पंढरपूरला येणार

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 26 जुलै : मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर पकडलाय. आरक्षण देण्याची घोषणा भाजपने आपल्या जाहीरनाम्यात केली होती तसच सत्तेवर येताच निर्णय घेऊ असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे त्या आश्वासनाचं काय झालं याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रश्नावर होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवारांच्या उपस्थितीला काही जणांनी विरोध केलाय.

अभिजीत बिचुकलेला मोठा दिलासा, खंडणी प्रकरणात जामीन मंजूर

पाच वर्षापूर्वी धनगर आरक्षणाची सुरूवात पंढरपूरातून झाली होती. यानंतरच बारामतीला मोठ आंदोलन उभ राहिलं. तरीही आरक्षणाचा प्रश्न हा सुटू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाने पंढरपूरात दोन लाख धनगर समाजाच्या उपस्थितीत आरक्षण मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि आमदार रामहरी रूपनर यांनी दिली.

सावधान! विकेंडला घराबाहेर पडणे टाळा, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे..

तर शरद पवार यांनीच धनगर समाजाचे आरक्षण प्रलंबित ठेवले असून आज पर्यंत तेच सत्तेत होते. हा प्रश्न ते सोडवू शकत होते मात्र सोडवला नाही. त्यामुळे आता शरद पवार यांना धनगर आरक्षण प्रश्नी कार्यक्रमात बोलवू नये अशी मागणी पंढरपूरातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी केली आहे. शरद पवार आले तर त्यांना सभेत बोलू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. Mआधीच पंढरपूर दोन दिवसांच्या अंतराने धनगर समाजाचे दोन कार्यक्रम होत असतानाच आता सभेतील उपस्थिता वरून वाद समोर आला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...