आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाल फसवलं - सुप्रिया सुळे

आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाल फसवलं - सुप्रिया सुळे

'महाराष्ट्रात धनगर समाजाची मतं मिळवण्यासाठीच मुख्यमंत्री आणि भाजपने आश्वासनांची गाजरे ठेवल्याचं सिद्ध झालं'

  • Share this:

दिल्ली,17 डिसेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन धनगर समाजाला फसवलं असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. धनगर समाजाला अनुसुचित जमातीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे अद्याप पाठवलेलाच नाही. केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत त्याबाबत दिलेल्या उत्तरातून ही गोष्ट स्पष्ट झाली. त्यामुळे आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाच नाही असंही सुळे म्हणाल्या.

केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाने लोकसभेत   दिलेल्या उत्तरानुसार, 'धनगर समाजाला अनुसुचित जमातीचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने प्रस्तावच पाठविलेला नाही. जोपर्यंत असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाला हा दर्जा देता येणार नाही.

विशेष म्हणजे राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यानंतर रजिस्टर जनरल ऑफ इंडिया आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाने त्याबाबतची शिफारस सरकारकडे पाठविणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्याशिवाय धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या यादीत समाविष्ट करणं अशक्य असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय.

महाराष्ट्रात धनगर समाजाची मतं मिळवण्यासाठीच मुख्यमंत्री आणि भाजपने आश्वासनांची गाजरे ठेवल्याचं सिद्ध झालं असा आरोपही सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. आज महाराष्ट्र सरकारला  चार वर्षे झाली. केंद्रातही त्यांचेच सरकार आहे. तरीही आरक्षणाबाबत कहीही हालचाल होत नाही असा आरोपही त्यांनी केला.

LIVE VIDEO : मुंबई कामगार रुग्णालयात अग्निशमन दलाचा जवान शिडीवरुन खाली कोसळला

First published: December 17, 2018, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading