मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या हे कशाचे लक्षण - धनंजय मुंडे

20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या हे कशाचे लक्षण - धनंजय मुंडे

    मुंबई, 19 नोव्हेंबर : चालु हिवाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडुन युती सरकारने नवा विक्रम केला असल्याची उपरोधिक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते माध्यमांशी बोलत होते. सरकारने राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, हे जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली. कोणताही विकास न करता राज्य कर्जबाजारी करण्याचे काम सरकारने केले आहे. 20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागत असतील तर हे राज्य आर्थिक दृष्ट्या संकटात सापडल्याचे लक्षण आहे. राज्यावर साडेचार लाख कोटी रूपयांचा कर्जाचा डोंगर आधीच झाला आहे. सरकारने राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, हे जाहीर करावे अशी मागणीही मुंडे यांनी केली.  LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग
    First published:

    Tags: Dhananjay mundhe, State goverment, Winter session

    पुढील बातम्या