धनंजय मुंडेंचा फ्लॅट बँकेच्या ताब्यात, हे आहे कारण!

धनंजय मुंडेंचा फ्लॅट बँकेच्या ताब्यात, हे आहे कारण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा पुण्यातील फ्लॅट बँकेनं ताब्यात घेतला आहे.

  • Share this:

पुणे, 28 ऑक्टोबर : राज्यातील परळी विधानसभा मतदारसंघात सर्वात चुरशीची अशी लढत झाली. या ठिकाणी मुंडे बंधु-भगिनीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करून राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. आता त्यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. दरम्यान, पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेनं कारवाई केली आहे. त्यांचा फ्लॅट बँकेनं ताब्यात घेतला आहे. तर हा राजकीय कट असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने शुक्रवारी एक जाहिरात दिली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी इथल्या युगाई ग्रीन सोसायटीमध्ये धनंजय मुंडे यांच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर जप्ती आणल्याचे म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिल भोसले यांच्याच नियंत्रणात ही बँक होती. याबाबतचे वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. एनपीएमधील फुगवट्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते. तसेच ऑक्टोबरमध्ये बँकेचं संचालक मंडळही बरखास्त कऱण्यात आलं होतं. सध्या या बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, गेल्या महिन्यात कर्जाबाबतची नोटीस आली होती. तेव्हा मी बँक प्रशासनाला विनंती केली होती की, आता मी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे 30 ऑक्टोबरनंतर कर्ज फेडेन. माझ्या विनंतीनंतरही बँकेनं पुढची कारवाई करत फ्लॅट ताब्यात घेतला. कर्जाची काही रक्कम दिली आहे. मात्र काही आर्थिक अडचणींमुळे उर्वरित रक्कम भरता आली नाही असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 10:27 AM IST

ताज्या बातम्या